पुष्पाची क्रेझ संपेना.... लग्नात नवदेवाचा जबरदस्त उखाणा
लग्नातील नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल, उखाण्यात म्हणतोय.... झुकेगा नही साला...
मुंबई : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा' या सिनेमाने साऱ्यांनाच वेड लावलंय. पुष्पाचा फिवर अद्याप उतरलेला नाही. पुष्पा सिनेमातील 'झुकेगा नही साला' या डायलॉगची आजही चर्चा आहे. या डायलॉगची मदत घेत नवरदेवाने एक उखाणा घेतला आहे.
नवरदेवाचा अजब उखाणा
काल झालं आमचं लग्न
लग्नात आला होता बँडवाला
स्वातीचं नाव घेतो...
झुकेगा नही साला....
नवरदेव आणि नववधु उभे आहेत. नववधु मान खाली घालून उभी आहेत. पण नवरदेवाने अतिशय तोऱ्यात हा उखाणा घेतला आहे. या उखाण्याची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे.
शाळेतील शिक्षक मात्र पुष्पाच्या विरोधात
पुष्पा हा सिनेमा कमर्शियल सिनेमा आहे. या सिनेमात हिंसक दृश्य मोठ्या प्रमाणात आहेत, पुष्पा हा एक रक्त चंदन लाकडाचा तस्कर दाखवण्यात आला आहे. तर पुष्पा हा काही आदर्श घेण्याचं पात्र नाही, असं शिक्षकांना म्हणायचं आहे, हा एक व्यावसायिक सिनेमा आहे.
त्याच्याकडे व्यावसायिक सिनेमा, मनोरंजन यासारखंच पाहिलं पाहिजे, यातील वाईट वाटणाऱ्या गोष्टी ज्या नैतिकतेच्या चौकटीत बसत नाहीत. त्या तिथंच विसरल्या गेल्या पाहिजेत, असा हा संदेश आहे. शहीद भगतसिंह सारख्या लोकांचा हा देश आहे हे विसरु नये, अशी आठवण देखील त्यांनी करुन दिली आहे.