मुंबई : 'झुंड', 'पावनखिंड' आणि 'काश्मीर फाईल्स' या सिनेमावरून जो वाद सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीचं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. मी फक्त झुंडच बघणार असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचंही मला पटत नाही. तुम्ही सगळे सिनेमे पाहा. अगदी पावनखिंड आणि काश्मीर फाईल्सही पाहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद आहे. त्याला काही अर्थ नाही, असं देखील नागराज मंजुळे म्हणाले. झुंड सिनेमा टॅक्स फ्री व्हावा याकरता मिटिंग घेतली जात असल्याची कोणतीच कल्पना नागराज मंजुळे यांना माहित नसल्याचं सांगितलं जात आहे. 



माझ्या प्रेमापोटी देखील झुंड पाहा असं म्हणणाऱ्या लोकांच देखील मला पटत नाही. माझी विनंती आहे, असं काही करू नका. रागाने किंवा माझ्या प्रेमापोटी झुंड पाहा असं अजिबातच म्हणू नका. 



सिनेमा आहे, पाहा, विचार करा, तुमच्या जीवनात त्याचा परिणाम झाला तर चांगलच आहे. सिनेमा चालू राहणारच, दिग्दर्शक घरी राहणार पण तुम्ही सिनेमाबाहेर अशी हाणामारी करणं योग्य नाही, असं मत नागराज मंजुळेने व्यक्त केलंय.