मुंबई : काही दिवसांपूर्वीच मिस वर्ल्ड ठरलेली विश्व सुंदरी मानुषी छिल्लरला डेट करण्याची इच्छा एकाने व्यक्त केली आहे.


१७ प्रतिस्पर्धी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊचा राहणारा जितेश सिंह देव यांने पीटर इंग्लंडच्या मिस्टर इंडिया २०१७ चा खिताब जिंकला आहे. अभी खजुरिया फर्स्ट रनर-अप तर पवन राव द्वितीय रनर-अप ठरला. मिस्टर इंडिया स्पर्धेत फायनलमध्ये १७ प्रतिस्पर्धी होते. अभिनेत्री कंगना रनौतने विजेत्यांना पुरस्कार प्रदान केला.


भारताचं प्रतिनिधित्व करणार


जितेश आता मिस्टर व‌र्ल्ड २०२० स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. खिताब जिंकल्यानंतर जितेश सिंहने म्हटलं की, 'मी खिताब मिळेल का याबाबत विचार नव्हता केला पण मला स्वत:वर विश्वास होता. आत्मविश्वासची ताकद तुम्हाला प्रेरणा देते. जेव्हा माझ्या नावाची घोषणा झाली तर मला विश्वास बसत नव्हता. माझ्याकडे बोलायला शब्दच नव्हते.


नव्या इनिंगची सुरुवात


जितेश सिंह याने म्हटलं की, 'खिताब जिंकण्यासोबतच जबाबदारी पण वाढते. मिस्टर व‌र्ल्डची स्पर्धा अधिक कठीण होणार आहे. आज मी माझ्या विजयाची पार्टी करेल पण उद्या मी माझ्या नव्या इनिंगची सुरुवात करेल. मला अधिक मेहनत घ्यायची आहे.


मानुषीला करायचंय डेट


जेव्हा जितेश सिंहला विचारण्यात आलं की, जर त्याला कोणासोबत डेट करण्याची संधी मिळाली तर तो कोणाला डेट करेल. यावर त्याने म्हटलं की मी विश्व सुंदरी मानुषी छिल्लरसोबत जाईल.