`गोदावरी` सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजनसाठी अभिनेता जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणतो...
Nikhil Mahajan`s National Award for Godawari : ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.
Jitendra Joshi Emotional Post : सिनेसृष्टीतील मानाच्या मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Award) घोषणा झाली आहे. दोन मराठी चित्रपटांना पुरस्कार जाहीर झाला आहे. एकदा काय झालं आणि गोदावरी या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. 'गोदावरी' (Godavari) या सिनेमासाठी दिग्दर्शक निखिल महाजनला (Nikhil Mahajan) 69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. अशातच आता गोदावरी सिनेमामधील मुख्य कलाकार जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने भावूक पोस्ट केली आहे.
नेमकं काय म्हणाला जितेंद्र जोशी?
निखिल तुझ्यात दृष्टीचा पाठपुरावा करण्याचं धैर्य आहे. अनेक अडचणी येऊनही तू डगमगला नाही. अयशस्वी झाल्यावर त्यानं हार मानली नाही. ज्यांना सिनेमा हे माध्यम आवडते आणि त्याबद्दल प्रेम आहे तो हार मानत नाही, कारण त्यांना माहित असतं की अशी प्रक्रिया आहे जी त्यांच्यासाठी एकजुटीवर विश्वास ठेवणार्या उत्कट लोकांसह वाट पाहत आहे. आज जेव्हा सर्वजण माझ्या मित्राचं कौतुक करत आहेत तेव्हा मला त्याचे पालक अनिल काका आणि अलका काकू यांचे मनापासून आभार मानायचे आहे, ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.
बरेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल मला माहिती नाही, पण सर्व स्वयंपाकी आणि आचारी ज्यांनी त्याला मस्त जेवण दिलं आणि विशेषतः मैदा रोटी.. त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याच्या प्रवासात त्याला प्रेरणा देणारे सर्व लोक आणि समीक्षक सर्वांचे आभार. तुमचा सहवास दीर्घकाळ टिकेल किंवा कधीही टिकेल अशी माझी इच्छा आहे. गोदावरी कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा तुमचाही प्रयत्न आहे. तेरेको मिला मतलब मरेको मिला, फक्र से सीना तन गया, असं म्हणत जितेंद्र जोशीने भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये राहणाऱ्या निशिकांतच्या हसत्या खेळत्या कुटुंबातील चढउतार सिनेमामध्ये दाखवण्यात आले आहेत. तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आलंय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही 'गोदावरी' सिनेमाला गौरवण्यात आलं होतं. आता या सिनेमाला राष्ट्रीय अवॉर्ड मिळाला आहे.