'माझा कार्यक्रम आहे... मग मला उत आलाय का?', भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video

Jitendra Joshi Angry Video : अवधूत गुप्ते जितेंद्र जोशीला आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन, असा प्रश्न विचारतो विचारतो. गुप्तेंचा हा प्रश्न जितेंद्र जोशीला खुपलेला दिसत आहे

Updated: Aug 23, 2023, 09:15 PM IST
'माझा कार्यक्रम आहे... मग मला उत आलाय का?', भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video title=
Jitendra Joshi Angry Video

Jitendra Joshi vs Avdhoot Gupte : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' याचं तिसरं पर्व सध्या जोरदार चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या झी मराठीकडून शेअर करण्यात आला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात नुकतंच अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) याने हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो सध्या चर्चेत आहे. त्याला कारण ठरलंय. अवधुत गुप्ते (Avdhoot Gupte) आणि जितेंद्र जोशी यांच्यातील भांडण. नेमकं काय झालं? पाहा...

खुपते तिथे गुप्तेच्या तिसऱ्या पर्वात राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. तर सई ताम्हणकरसह इतर अनेक कलाकारांनी देखील या मंचावर हजेरी लावली. त्यानंतर आता जितेंद्र जोशीने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. त्यावेळी त्यांना खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. त्याला जितेंद्र जोशीने मनमोकळी उत्तरं दिली आहेत.

नेमकं काय झालं?

समोर आलेल्या प्रोमोनुसार, अवधुत गुप्ते आणि जितेंद्र जोशी यांनी एक गाणं म्हणत एकत्र एन्ट्री मारली. त्यानंतर दोघांच्या संवादाला सुरूवात झाली. अवधूत गुप्ते जितेंद्र जोशीला आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन, असा प्रश्न विचारतो विचारतो. गुप्तेंचा हा प्रश्न जितेंद्र जोशीला खुपलेला दिसत आहे. तुझा आवडता अभिनेता कोण संतोष जुवेकर की जितेंद्र जोशी, असा प्रतिप्रश्न जितेंद्र जोशी अवधुत गुप्तेला करतो. त्यावरून वाद पेटल्याचं दिसतंय. हा माझा कार्यक्रम आहे, असं अवधुत गुप्ते म्हणतोय.

नाही नाही मला बोलू दे...हा ही खुर्ची प्रश्न विचारण्याची आहे, असं म्हणत दोघांची बाचाबाची होते. आम्ही इथे बसलेलो असतो, आम्हाला उत आलाय का? असं जितेंद्र जोशी म्हणताना दिसत आहे. मात्र, जितेंद्र जोशीच्या कलाकारीवर खाली बसलेला अवधुत गुप्ते हसताना दिसत आहे. त्यामुळे प्रोमो हा एडिटिंगची कमाल आहे की खरीखुरी अॅक्टिंग? हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.

पाहा Video

दरम्यान, 27 ऑगस्ट म्हणजेच रविवार रात्री 10 वाजता तुम्हाला हा कार्यक्रम पाहता येणार आहे. झी मराठी चॅनल तसेच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.