जिया खान मृत्यूप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
Jiah Khan Suicide Case Verdict Today: 10 वर्षांपुर्वी अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यूप्रकरणी (Jiah Khan Case) अभिनेता सूरज पांचोलीला गुन्हेगार म्हणून पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. जियाला आत्महत्या करण्यास पृवत्त केल्यामुळे त्याला ही अटक झाली होती. जियाच्या (Abetting Jiah Khan) पत्रात सूरज पांचोलीचे नावं आले होते परंतु आज मुंबईत झालेल्या सीबीआयच्या कोर्टानं सूरज पांचोली ह्याची (Sooraj Pancholi acquitted) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Jiah Khan Suicide Case Verdict Today: 2013 साली अभिनेत्री जिया खान हिनं आपल्या राहत्या घरी गळफास (Jiah Khan Case Results) लावून आपलं आयुष्य संपवलं होतं. आज कोर्टात 12.30 वाजता जिया खानच्या आत्महत्या प्रकरणी सुनावणी होती. तिच्या मृत्यूप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोळीचा मुलगा सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यावर गेली 10 वर्षे खटला सुरू होता. आज त्याचा निकाल लागला असून सूरज पांचोलीची निर्दाेषमुक्तता झाली आहे.
जिया खान हिच्या आईनं अभिनेता सूरज पांचोलीवर आपल्या मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. त्यावेळी सूरजचा उल्लेखही जिया खानच्या पत्रात आला होता. गेली दहा वर्ष हा खटला सुरू (Sooraj Pancholi Latest News) होता परंतु आज त्यावर निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे अभिनेता सूरज पांचोलीला मोठा दिलासा मिळाला आहे.
पुराव्यांअभावी सूरज पांचोलीला ही निर्दोषमुक्तता झाली आहे. सीबीआयनं विशेष कोर्टाकडून आज 12 वाजून 26 मिनिटांनी निर्णय दिला. यामध्ये सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे त्यामुळे गेल्या 10 वर्षांपासून चालत असणाऱ्या या खटल्याला आता पुर्णविराम मिळाला असून सूरज पांचोलीला क्लिन चीट मिळाली आहे. पुराव्यांच्या अभावामुळे, कोर्टानं सूरज पांचोली याला निर्दोष मुक्त करण्यात आल्याचा निकाल न्यायाधीश ए.एस सय्यद यांनी विशेष सीबीआय कोर्टात जाहीर केला. यावेळी तो आपल्या आईसह अभिनेत्री झरीना वाहाबसोबत (Zarina Wahab) कोर्टात हजर होता.
काय आहे निर्णय?
जिया खानच्या मृत्यूप्रकरणी तिला आत्महत्या करण्यात सूरज पंचोलीनं प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जर का आज त्याला दोषी ठरवण्यात आलं असतं तर सीबीआय न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याला 10 वर्षांचा तुरंगवास होऊ शकला असता. सूरज पांचोलीच्या आईनं आपलं मतं जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ''मला पुर्ण विश्वास होता की माझा मुलगा निर्दोष आहे. माझ्या मुलाला न्याय मिळाला आहे. कारण तो निर्दोष आहे.''
काय होतं नेमकं प्रकरण?
सूरज पांचोली हा जिया खानचा प्रियकर होता. 3 जून 2013 साली जिया खान आपल्या जुहूच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. या प्रकरणानंतर जियाच्या आईनं सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सूरजला पोलिसांनी पकडलेही होते. सध्या सूरज जामीनावर आहे. तेवढ्यात मध्यंतरी त्यानं सुनिल शेट्टीची लेक अथिया शेट्टी समवेत 'हिरो' हा 2015 साली आलेला चित्रपटही केला आहे. समोर आलेल्या एएनआयच्या माहितीनुसार, सूरज पांचोली आपल्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री झरीना वहाब मुंबईच्या कोर्टात हजर झाले आहेत.
जिया खानची आई लढणार!
जिया खानची आई रबीना खान (Rabina Khan) हिनं आपण लढणार असल्याचे सांगितले आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही हाय कोर्टात जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.