मुंबई :  हिंदी कलाविश्वात 'देसी गर्ल' म्हणून आपली ओळख प्रस्थापित केल्यानंतर प्रियांका चोप्राने तिचा मोर्चा आंतरराष्ट्रीय कलाविश्वाकडे वळवला. ज्यांतर प्रियांका तेथेही चांगलीच स्थिरावली. प्रियांकाने करिअरमध्ये बरीच प्रगती केली. त्यासोबतच तिने खासगी आयुष्यातही पुढचं पाऊल ठेवत निक जोनास या अमेरिकन गायकासोबतच्या आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच या नात्याविषयी अधिकृत घोषणा केल्यानंतर सेलिब्रिटी वर्तुळात प्रियांका आणि निकवर अनेकांच्याच नजरा खिळल्या आहेत.


सध्या बी- टाऊमध्ये वाहणारे लग्नाचे वारे पाहता येत्या काळात त्यांच्या घरीही सनई- चौघडे वाजण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत. 


काही दिवसांपासून प्रियांका भारतात असून निकही आता इथे पोहोचला आहे. एकमेकांसोबत काही खास क्षण व्यतीत केल्यानंतर ही जोडी पोहोचली, थेट जोधपूरच्या मेहरानगढ किल्ल्यावर. 


मुख्य म्हणजे ते या वास्तूला भेट देण्यामागे त्यांच्या लग्नाच्या तयारीचं कारण असल्याचं कळत आहे. 


बऱ्याच सेलिब्रिटींनी लग्नासाठी इटलीची निवड केलेली असताना प्रियांका मात्र भारतातच शाही थाटात लग्नगाठ बांधणार असल्याचं कळत आहे. 



मेहरानगढ किल्ल्याला त्यांनी दिलेली भेट पाहता हेच त्यांच्या लग्नासाठीचं ठिकाण असू शकतं ही शक्यताही वर्तवण्य़ात येत आहे. 


प्रियांका आणि निक नेमके कोणत्या ठिकाणी लग्न करणार हे अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं असलं तरीही त्यांची कोणत्या ठिकाणांनी पसंती आहे हे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती फक्त अधिकृत घोषणेचीच.