मुंबई : बॉलिवूडमधील हॉट अभिनेता जॉन अब्राहमने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताच या फोटोचा सोशल मीडियावर बोलबाला होतोय. फोटोत जॉन अब्राहम मसल्सवर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉनचा हा न्यूड फोटो ,सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोत या वेळी जॉन, अर्ध न्यूड अवस्थेत सोफ्यावर बसलेला दिसत आहे. 'वेटिंग फॉर माय वार्डरोब' असं या फोटोला जॉनने आर्कषित कॅप्शनही दिलं आहे. जॉनच्या या कॅप्शनवरून चाहत्यांचा अंदाज आहे, हे त्याचे न्यूड फोटोशूट आहे .मात्र हा फोटो एका सिनेमाच्या सेटवरील आहे.


जॉन नेहमीच आपल्या मसल्सचे, त्याच्या बॉडीचे फोटो शेअर करत असतो. मात्र शेअर केलेला हा न्यूड फोटो नेटकऱ्यांच्या आर्कषणाचा विषय ठरतोय. जॉन आपल्या फिटनेसबाबत खूप गंभीर आहे. असा एकही दिवस जात नाही, ज्या दिवशी जॉन जिममध्ये घाम गाळत नसेल.



जॉनने त्याचा आगामी सिनेमा 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटावर काम सुरू केले आहे.  शेअर केलेला हा फोटो  चित्रपटाच्या सेटवरील असल्याचं समजत आहे. या फोटोत जॉन एका उशीच्या सहाय्याने स्वत: ला झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.


लवकरच अभिनेता जॉन अब्राहम संजय गुप्ता दिग्दर्शित 'मुंबई सागा' सिनेमात  दिसणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात तो माफियाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या अगोदर अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने आपला बीचवरील न्यूड फोटो शेअर केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. मिलिंद सोमणच्या त्या फोटोनंतर त्याच्यावर टीका देखील झाली होती.