सत्यमेव जयते, परमाणूनंतर जॉन आता `रॉ`मधून प्रेक्षकांच्या भेटीला
८ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार जॉन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने आपल्या अभिनयाने अनेकांचं मन जिंकलं. जॉनने देशभक्तीवर आधारित सिनेमांमधून भारतीयांचं मन जिंकलं. मागच्या वर्षी सत्यमेव जयते आणि परमाणू सारख्या सिनेमांमधून जॉनने कौतुक मिळवलं होतं. आता रॉ सिनेमामधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमियो अकबर वॉल्टर असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमध्ये जॉन एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. त्याचा लूक यामध्ये बदललेला दिसतो आहे.
पोस्टरमध्ये जॉनच्या हातात माचिसची पेटी दिसत आहे. पोस्टर सोबतच सिनेमाच्या टीझरची देखील घोषणा झाली आहे. आज याचा टीझर रिलीज होणार आहे.
जॉन अब्राहम या सिनेमामध्ये आठ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये तो २६ ते ८५ वयापर्यंतच्य़ा लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तो रियल लाइफ गुप्तहेरची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी जॉनने हा खुलासा केला होता की, हे त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं.
'रॉ'मध्ये जॉन अब्राहम एक भारतीय गुप्तहेरच्या भूमिकेत दिसत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन तो तेथील काही गुप्त गोष्टी बाहेर आणतो. या सिनेमात जॉन सोबतच मौनी रॉय मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच सिनेमात जॅकी श्रॉफ, सुचित्रा कृष्णमूर्ती आणि सिकंदर खेर यांच्या देखील भूमिका आहेत.