मुंबई: 'WWE'या प्रोफेशनल रेसलिंग प्रकारात जोरदार यश संपादन केल्यावर आपला मोर्चा फिल्म इंडस्ट्रीकडे वळवणाऱ्या जॉन सीनाचा नवा चित्रपट येतोय. 'Bumblebee' असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव असून, त्या एका मिलिट्रीमनची भूमिका जॉन साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला. ट्रान्सफॉर्म फ्रँचायजीने या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला आहे. या आधी फ्रँचायजीचे ट्रान्सफॉर्म, ट्रान्सफॉर्म: रिवेंज ऑफ फॉलन, ट्रांसफॉर्मर्स: द एज ऑफ एक्सटिंक्शन, ट्रॉन्सफॉर्म: द लास्ट नाईट आदी चित्रपट आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीनाच्या या हटके भूमिकेबद्धल अद्याप विस्तृत माहिती पुढे आली नाही. मात्र, १६ वेळा 'WWE'चॅम्पीयन ठरलेला सीना या आधी 'द वॉल' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातही सीनाने मिलिट्रमॅनचीच भूमिका निभावली आहे. सीनाच्या नव्या कोऱ्या चित्रपटाचा ट्रेलर भारतातही युट्यूबवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. काही काळापूर्वी हा 'Bumblebee' चित्रपटाचा ट्रेलर ट्रेण्डींगमध्ये १०व्या स्थानावर होता.सीनाला यशस्वी 'WWE' स्टार म्हणून ओळखले जाते. त्याचे चाहते जगभरात आहेत. 


पाहा सीनाच्या 'Bumblebee'चा ट्रेलर