मुंबई : हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप सध्या सुटकेचा श्वास घेत आहे. एक्स पत्नी अंबर हर्डसोबत सहा आठवडे चाललेली मानहानीची कायदेशीर लढाई आता संपली आहे. जॉनी डेपने 50 मिलियन डॉलर मानहानीचा खटला जिंकला आहे. जॉनी आजकाल गिटार वादक जेफ बेकसोबत खूप दिसतो. नुकतंच दोघंही इंग्लंडमध्ये एका म्युझिक टूर दरम्यान एकत्र दिसले होते. तर आता दोघंही बर्मिंघममधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये इतर काही मित्रांसह एकत्र जेवताना दिसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बातमी अशी आहे की जॉनी डेपने या रेस्टॉरंटमध्ये जेवण आणि टीप मिळून 49 लाख रुपये खर्च केले आहेत. एम्बर हर्डविरुद्धच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जॉनी डेप तेथे आल्याचं समजतंय.


जॉनी डेप प्रत्यक्षात जेफ बेकला त्याच्या दौऱ्यावर पाठिंबा देण्यासाठी आला आहे. दोघंही इंग्लंडच्या रस्त्यांवर, कधी पबच्या बाहेर तर कधी रेस्टॉरंट बारमध्ये दिसत आहेत. एका बातमीनुसार, दोघंही नुकतेच एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला पोहोचले होते. तिथे दोघांनी काही भारतीय पदार्थ चाखले. जॉनी डेप आणि जेफ बेक यांच्यासोबत आणखी काही लोकंही तिथे उपस्थित होते.


वाराणसीच्या रेस्टॉरंटमध्ये जॉनी डेपची पार्टी तब्बल 5 तास चालली
रिपोर्टनुसार, जॉनी डेप आपल्या सहकाऱ्यांसोबत रविवारी संध्याकाळी ७ वाजता बर्मिंघमच्या लोकप्रिय 'वाराणसी' रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. तिथे त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत फोटोही काढले. यावेळी हे रेस्टॉरंट इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी बंद ठेवण्यात आलं होतं. जॉनी डेप आणि त्याचे मित्र मध्यरात्रीनंतर निघून गेले. रेस्टॉरंटचे संचालक मोहम्मद हुसेन म्हणाले, 'तो आमचा खास पाहुणा होता. त्यावेळी कोणीही सामान्य माणूस तिथे येऊन त्रास देऊ नये. अशी आमची इच्छा होती. तो खूप आनंदी आणि डाउन टू अर्थ व्यक्ती आहे.