मुंबई : टीव्हीची लोकप्रिय कॉमेडिअन भारती सिंह (Bharati Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिम्बचिया (Harsh Limbachiyaaहे खूप मोठ्या संकटात अडकले आहेत. या दाम्पत्यावर ड्रग्सशी संबंध असल्याचा आरोप लावत एनसीबीने अटक केलं आहे. या दोघांचा मुंबईतील किला कोर्टात ड्रग्स प्रकरणात फैसला होणार आहे. या प्रकरणात भारती आणि हर्षने जामीनाकरता अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी झाली असून १५ हजारांवर जामीन मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारती सिंह आणि तिच्या नवऱ्याला हर्ष लिम्बाचिया यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भारती सिंहला कल्याण कारागृहात तर हर्षला तळोजा कारागृहात पाठवण्यात आलं आहे. हे ड्रग्स प्रकरण असल्यामुळे याचा निर्णय किला न्यायालयात होणार आहे.



जॉनी लीवरने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार,'मी भारती आणि हर्षला एक सांगू इच्छितो. जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्ही सगळ्यांना विनंती करा की, ड्रग्सचं सेवन करू नका.'  जॉनी लीवर पुढे म्हणाले की,'संजय दत्तला बघा त्यांनी जगासमोर आपण ड्रग्सचं सेवन करत असल्याचं कबुल केलं. आपली चूक स्विकारून ड्रग्स सोडण्याची शपथ घ्या. याकरता तुम्हाला कुणी फुलांच्या गुच्छ देणार नाही.'


कॉमेडीयन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) यांना रविवारी न्यायालयानं 4 डिसेंबरपर्यंतची कोठडी सुनावली. ज्यानंतर या दोघांच्याही अडचणीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. नारकोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने अटक केल्यानंतर रविवारी त्यांना मुंबईतील (Kila Court पुढं हजर करण्यात आलं होतं. पण, न्यायालयीन कोठडीचा निर्णय सुनावताच हर्ष आणि भारतीनं जामीन अर्ज दाखल केला होता. ज्यावर सोमवारी सुनावणी करण्यात आली.