Jolly LLB 3 Akshay Kumar and Arshad Warsi : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे दोघेही आता एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. हे जेव्हा पासून प्रेक्षकांना कळलं आहे तेव्हा पासून त्यांचा आनंद हा गगनात मावेना असा झाला आहे. त्या दोघांनी 'जॉली एलएलबी' च्या वेगवेगळ्या फ्रॅन्चायझीमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. आता ते दोघं एका केससाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहणार आहेत. याचा खुलासा काही दिवसांपूर्वी झाला होता. पण आता अक्षय कुमारनं व्हिडीओ शेअर करत ही अधिकृत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. आता अक्षय कुमारनं चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली याविषयी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांनी माहिती दिली आहे. अक्षयनं शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओत तो आणि अर्शद वारसी जॉली असल्याचा दावा करत असल्याचे दिसत आहे. एकीकडे अर्शद म्हणतो 'जगदीश त्यागी उर्फ जॉली, बीए एलएलबी. डुप्लीकेटपासून सावध रहा.' तर दुसरीकडे अक्षय कुमार म्हणतो की 'जगदीश्वर मिश्रा बीए एलएलबी. ओरिजिनल जॉली, लखनऊचा.'  या दोघांनंतर व्हिडीओत सौरभ शुक्ला दिसतात. सौरभ शुक्ला यांनी त्या दोघांच्या चित्रपटात न्यायाधिशांची भूमिका साकारली आहे. तर व्हिडीओत त्यांनी 'शूट बिगिन्स' हा प्लेकार्ड हातात धरलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : देख रहा है बिनोद! Panchayat Season 3 'या' दिवशी होणार प्रदर्शित


अर्शद वारसीला या चित्रपटात पाहून सगळ्या प्रेक्षकांना 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जॉली एलएलबी' मध्ये पाहायला मिळालेली कॉमेडी आठवली. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड पुरस्कार मिळाला होता. अर्शद वारसी, बोमन ईरानी आणि सौरभ शुक्ला या तिघांनी इतकी चांगली पटकथा आपल्यासमोर इतक्या मजेशीर पद्धतीनं सांगितली की सगळ्यांचा लक्षात राहिली. पहिल्या चित्रपटाची पटकथा ही दिल्लीच्या एका कोर्टातील दाखवण्यात आली आहे तर अर्शद वारसीच्या भूमिकेचं नाव जगदीश त्यागी उर्फ जॉली असं होतं. त्यानंतर 2017 मध्ये 'जॉली एलएलबी 2' प्रदर्शित झाला. त्यावेळी लखनऊच्या कोर्टातील पटकथा दाखवण्यात आली. त्यात अक्षय कुमारनं जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली ही भूमिका साकारली होती. आता हे दोन्ही जॉली एकमेकांसमोर येणार असल्यानं किती धम्माल पाहायला मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.