Jr NTR : एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटातील अभिनेता ज्युनियर एनटीआर हा त्याचा आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. ज्युनियर एनटीआर लवकरत हृतिक रोशनसोबत 'वॉर 2' या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच तो मुंबईमध्ये स्पॉट होणार आहे. पण यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे एसएस राजामौली चर्चेत आला आहे. तो एका हॉटेलमध्ये एन्ट्री करत असताना पापाराझींवर ओरडताना दिसला. त्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्युनियर एनटीआरचा हा व्हिडीओ टोटल फिल्मी या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत ज्युनियर एनटीआर हा फोन मध्ये बोलताना दिसतोय. तर पापाराझी हे ज्युनियर एनटीआरच्या मागे-मागे हॉटेलच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. अशात त्यांना मागून येताना पाहून ज्युनियर एनटीआर हा त्यांच्यावर चिडल्याचे पाहायला मिळत आहे. तो त्यांच्याकडे पाहून चिडला आणि 'ओय्य, ते परत ठेव' असं रागात म्हणाला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


ज्युनियर एनटीआरविषयी असं म्हटलं जातं की तो त्याच्या चाहत्यांना आणि बाकी लोकांवर खूप प्रेम करतो आणि त्यांच्याशी संवाद देखील साधला. पण इथे ज्यूनियर एनटीआर ज्या प्रकारे ओरडला त्यामुळे त्यानं असं का केलं हे पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हणाला की हा तेलगू अभिनेत्याचा अॅटिट्यूड आहे. दुसरा नेटकरी म्हणाला की हे लोक काहीही करतात, त्यांना सोडा, स्टार्स सुद्धा एक माणूस आहे. 


YRF Spy Universe च्या आगामी ‘वॉर 2’ मध्ये ज्युनियर एनटीआर दिसणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. तर सिद्धार्थ आनंद निर्मिती करत आहे. या चित्रपटाची पटकथा ही आदित्य चोप्रानं लिहिली आहे तर तो देखील निर्माता आहे. दरम्यान, यावर अनेक गोष्टींमध्ये अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


हेही वाचा : रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' राज... ‘Pushpa Pushpa’ मीम्स व्हायरलय


ज्युनियर एनटीआरकडे याशिवाय 'देवारा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, श्रीकांतसोबत इतर काही कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं बजेट हे 300 कोटी आहे. तर हा चित्रपट 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.