Devara Part 1 Trailer: 'RRR'चित्रपटामुळे देश-विदेशात चर्चेत आलेला अभिनेता जुनियर एनटीआरचा पुढील चित्रपट 'देवरा' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये जुनियर एनटीआरला पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देवरा' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये जुनियर एनटीआरसोबत जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज आणि शाइन टॉम चाकोसारखे दमदार कलाकार दिसणार आहेत. त्याचबरोबर विविध इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांसह 'देवरा' हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. 


'देवरा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


'देवरा' या चित्रपटाची कथा ही खूप मोठी आहे. महासागर रक्ताने लाल करणारी ही कथा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरची सुरुवात ही लुटमार आणि चाकू आणि खंजीर वापरण्यापासून होत आहे. यानंतर तुम्हाला खलनायक सैफ अली खान पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. तसेच व्हिडीओमध्ये जुनियर एनटीआरचा फर्स्ट लूक दिसत आहे. ज्यामध्ये त्याने शर्ट आणि काळी लुंगी घातली आहे. देवराला ब्रेक नाही. तो एक धकादायक व्यक्ती आहे. जो कोणाशीही सामना करण्याचा विचार करत नाही. 


या ट्रेलरमध्ये जुनियर एनटीआर हातात छोटी कुऱ्हाड आणि जड तलवार घेऊन शत्रूंविरुद्ध लढताना दिसत आहे. 'देवरा'चा हा लूक एनटीआरला भयानक हिंसक अवतारात दाखवतो. तो सैफ अली खानच्या पात्राचा सामना करत आहे. तो त्याच्यापासून गमावण्याच्या मनस्थितीत नाही. हा फाईट सीन आणि दोन कलाकारांमधील तणाव खरोखरच ह्रदयाला भिडणारा आहे. यामुळे प्रेक्षकांचा देखील उत्साह वाढला आहे. या ट्रेलरमध्ये जान्हवी कपूरची नाजूक दिसणारी काही दृश्ये आहेत. 


पाहा ट्रेलर



'देवरा' हा चित्रपट केवळ जुनियर एनटीआरच्या व्यक्तिरेखेवर आधारित असणार नाही असे व्हिडीओवरून स्पष्ट झाले आहे. ही गोष्ट एका बाप आणि मुलाची असावी असे प्रेक्षकांना वाटत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील गाणं रिलीज झाले आहे. ज्यामध्ये जुनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर दमदार आणि मजेदार डान्स करताना दिसत आहे. या डान्सची चर्चा देखील सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये रंगली आहे.