Jubin Nautiyal Accident : प्रसिद्ध गायक  जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. गायकाचा गंभीर अपघात झाला आहे. घरातील पायऱ्यांवरुन पडल्यामुळे गायकाला गंभीर दुखापत झाली आहे. जुबिन नौटियालच्या हाताला दुखापत झाली आहे. (jubin nautiyal songs )याशिवाय त्याच्या डोक्याला,आणि कपाळावर जखमा आहेत. सध्या गायकाला मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जुबिनवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Jubin Nautiyal Accident)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी जुबिन आणि योहाना यांना गाण्याच्या लॉन्च दरम्यान एकत्र  स्पॉट करण्यात आलं होतं. (jubin nautiyal new song) गाणं लॉन्च झाल्यानंतर गायक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर गायकाला दात आणि हातची शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. ( jubin nautiyal relationship)



जुबिनचा अपघात झाल्याचं कळताच चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली आहे. शिवाय गायकाची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून चाहते प्रार्थना देखील करत आहेत. (jubin nautiyal new song 2022)


जुबिन आडकला वादाच्या भोवऱ्यात
काही दिवसांपूर्वीच गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या आगामी शोमुळं त्याच्यावर अनेकांचाच रोष ओढावला. जुबिनविरोधात उठवल्या गेलेल्या आवाजामुळं त्याला अटक करण्याची मागणी करणाऱ्यांची संख्याही वाढली. पाहता पाहता सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. 


जुबिन ज्या कार्यक्रमात गाणार होता, त्याचा आयोजक एक गुन्हेगार असल्याची बाब हेरत त्याला कडाडून विरोध करण्यात आला. काहींनी तर, या गायकाला देशद्रोही (anti National) म्हणत हिणवलंसुद्धा. कित्येक वर्षांपासून आपण करत असलेल्या मेहनतीवर या सर्व वातावरणामुळं गालबोट लागल्याचं म्हणत त्यानंही नाराजी व्यक्त केली.