मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत काही ना काही कारणाने, वादाने चर्चेत असते. आता कंगनाने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण केला आहे. कंगनाच्या आगामी 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या सॉग्न लॉन्चदरम्यान झालेल्या पत्रपरिषदेत कंगनाने पत्रकाराशी केलेल्या उद्दटपणामुळे सर्व पत्रकारांनी तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. पत्रकारांनी कंगनाला याबाबत माफी मागण्याचं सांगतिलं. मात्र हा वाद वाढल्याने आता चित्रपट निर्माती एकता कपूरने पत्रकारांची माफी मागितली आहे. बेजबाबदार वर्तनामुळे कंगनाने माध्यमांचा रोष ओढावून घेतल्याचं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाजी टेलिफिल्मसने 'कोणाच्याही भावना दुखावण्याचा कंगणाचा हेतू नव्हता. आमचा चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. आम्ही या घटनेसाठी माफी मागत असून, या घटनेमुळे चित्रपट बनवण्यासाठी आम्ही घेतलेली मेहनत वाया जाऊ देऊ नये. अशी विनंती केल्याचं' म्हटलं आहे.


७ जुलै रोजी मुंबईत 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चवेळी हा संपूर्ण प्रकार घडला. या कार्यक्रमावेळी 'पीटीआय'च्या एका पत्रकाराने त्याचं नाव सांगून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याने प्रश्न विचारण्यापूर्वीच कंगणा त्याच्यासोबत उद्धटपणे बोलली. कंगणाने त्याच्यावर 'मणिकर्णिका' चित्रपटाच्यावेळी काही चुकीच्या गोष्टी लिहून, त्या ट्विट केल्याचे तिने आरोप केले. मात्र पत्रकाराने कंगनाच्या या आरोपांवर 'आम्ही जे लिहितो ते खंर लिहितो, मी कंगनाविरोधात कोणत्याही चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या नाहीत.' असं म्हणत आरोपांचं खंडण केलं. 


'मणिकर्णिका'साठी एका मुलाखतीदरम्यान तिच्या वॅनिटी व्हॅनमध्ये तीन तास व्यतित करत जेवणही केलं. मात्र तरीही त्याने माझ्या आणि चित्रपटाविरोधात अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या असल्याचं कंगणाने म्हटलंय. यावर पत्रकाराने मी तिच्यासोबत वॅनिटीमध्ये कधीही तीन तास घालवले नसून जेवण केलं नसल्याचं म्हटलंय.  


या संपूर्ण प्रकारामुळे पत्रकारांनी कंगनाला माफी मागण्याचं सांगतिलं. परंतु तिने माफी मागण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर आता एकताने पत्रकारांची माफी मागितली आहे.