Madhuri Dixit and Juhi Chawla : सध्या चर्चा आहे ती म्हणजे माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांची. 90 च्या दशकात त्या दोघी जणी प्रचंड लोकप्रिय होत्या. परंतु त्या दोघींमध्ये बरीच स्पर्धा होती. त्या दोघींनी आपल्या स्पर्धबद्दलची चुणूक प्रेक्षकांनी लागून दिली नव्हती. सध्या अशाच एका दिग्दर्शकानं त्या दोघींच्या स्पर्धेविषयी खुलासा केला आहे. नक्की यावेळी त्यानं काय म्हटलं आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावेळी फक्त जूही चावलाच नाही तर राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, काजोल, ऐश्वर्या राय बच्चन अशा अनेक अभिनेत्रींची चर्चा होती. त्यांच्यातही बरीच स्पर्धा होती. या अभिनेत्रींनी शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार यांच्यासमवेत कामं केली होती. यावेळी माधुरी आणि जुहीसोबत काम केलेल्या धर्मेश दर्शन या दिग्दर्शकांनी त्या दोघांबद्दल खुलासा केला आहे. समोर अशी माहिती आली होती की त्या दोघी एकमेकींच्या कट्टर दुश्मन आहेत आणि त्या दोघीही एकमेकींचा द्वेष करतात. परंतु यावर धर्मेश दर्शन यांनीच खुलासा केला आहे. धर्मेश दर्शन यांनी राजा हिंदुस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यावेी तिनं लहेरन रेट्रोशी बोलताना याचा खुलासा केला आहे. 


त्यांनी या मुलाखतीत सांगितले की, राजा हिंदुस्तानी या चित्रपटातून जुही चावलाला कास्ट करण्याचे ठरविले होते. त्यांनी लुटेरे हा चित्रपट दिग्दर्शित केला होता जो प्रचंड लोकप्रिय ठरला होता. 1993 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु जुही या चित्रपटात काम करण्यास राजी नव्हती. तेव्हा लुटेरेप्रमाणे हाही चित्रपट लोकप्रिय होईल असा विश्वास तिला नव्हता. परंतु ज्याप्रमाणे सुरज बडजात्या यांचा हम आपके हैं कौन हा चित्रपट लोकप्रिय झाला त्याप्रमाणे हाही होईल असं आश्वासन ते त्यांना देत होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि सलमान खान हे प्रमुख भुमिकेत होते. तेव्हा यावर जूही लगेचच तिला म्हणाली की, तू काही सूरज बडजात्या नाहीस. तेव्हा त्याचा राग आल्यावर त्यावर तो तिला म्हणाला तूही काही माधुरी दीक्षित नाहीस. 


त्यामुळे त्यावरून जूही चावला हिनं लागलीच त्या चित्रपटाला नकार दिला होता. ते म्हणाले की ती सुशिक्षित आहे. तेव्हा दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली आणि तिनं माझी माफी मागितली. तेव्हा त्यांनी करिश्माला ही गोष्ट सांगितली आणि मग तिला या चित्रपटासाठी फायनल केले. पुजा भट्ट आणि ऐश्वर्या राय बच्चनलाही या भुमिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी 'गुलाब गॅंग' आणि 'मजा मा' या चित्रपटातून एकत्र दिसल्या होत्या.