मुंबई : 'डर', 'कयामत से कयामत तक', 'हम हैं राही प्यार के', 'इश्क' अशा एकापेक्षा एक चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धझोतात आलेली अभिनेत्री जूही चावला सध्या रूपरे पडद्यापासून लांब आहे. पण सामाजिक कार्यात तिचा मोलाचा वाटा पाहायला मिळत आहे. आता तिच्या पावलांवर पावल ठेवत तिचा मुलगा अर्जून मेहता देखील सामाजिक जीवनात उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच, ऑस्ट्रेलियात भडकलेल्या आगीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील जनतेला जूहीच्या मुलाने मदत केली. आपल्या मुलाबद्दल सांगताना ती म्हणाली, 'ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीमुळे तेथे फार नुकसान झाले आहे. तर आता तू त्यांची मदत कशी करणार?' असा प्रश्न जूहीच्या मुलाने जूहीला विचारला.



मुलाच्या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली, 'कावेरी कॉलिंग प्रकल्पाच्या माध्यमातून मी आपल्या देशात वृक्षरोपण करण्यासाठी मदत करणार आहे.' त्यानंतर अर्जून आपल्या पाकीट मनीमध्ये असलेले ३०० पाउंड ऑस्ट्रेलियातील प्रभावित लोकांना पाठवले आहेत. 


मुलाच्या सामाजिक कार्यामुळे जूहीने देवाचे आभार मानले आहेत. अर्जून सध्या ब्रिटनमध्ये त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करत आहे. त्यामुळे त्याच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  


ऑस्ट्रेलियाच्या जंगलात भीषण आग लागली होती. या आगीमध्ये सुमारे ५० कोटींपेक्षा जास्त प्राण्यांनी आपले प्राण गमावले आहे. डिसेंबर महिन्यात लागलेल्या आगीनंतर विक्टोरिया आणि  न्यू साउथ वेल्समध्ये कमीत-कमी २० जणांचा मृत्यू झाला. तसेच रौद्र रूप धारण केलेल्या या आगीमुळे १ हजार ३०० पेक्षा जास्त घरं नष्ट झालीत.