लेकीसह `बार्बी` बघायला गेली आणि 10 मिनिटात थिएटरबाहेर आली; Barbie च्या निर्मात्यांवर भडकली अभिनेत्री
Juhi Parmar on Barbie Movie: सध्या जगभरात बार्बी हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे. या चित्रपटालाही मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. त्यातून सध्या हा चित्रपट प्रेक्षकांनीही डोक्यावर उचलून धरला आहे. परंतु एका अभिनेत्रीनं मात्र या चित्रपटावर रोष व्यक्त केला आहे.
Juhi Parmar on Barbie Movie: सध्या चर्चा आहे ती म्हणजे बार्बी या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. त्याचसोबत या चित्रपटाची. सर्वत्र क्रेझ आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्यात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सध्या हा चित्रपट लहान मुलं, तरूण वर्ग, सोबत लहान मुलांसह पालकही पाहायला जात असून मैत्रपरिवारासह कुटुंबियही जात आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सध्या चांगलीच क्रेझ आहे. सध्या अशाच एका चित्रपटानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सगळेच खासकरून गुलाबी कपडे घालून बार्बी चित्रपट पाहायला जात आहेत. त्यामुळे या चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या युथ कल्चरमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. परंतु एका अभिनेत्रीनं मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.
त्यातून या चित्रपटाला गेलेल्या अभिनेत्रीला मात्र आपल्या 10 वर्षांच्या मुलीला घेऊन परत माघारी अगदी पुढच्या 10 मिनिटांमध्ये यावं लागले आहे. तुम्ही म्हणाल की, इतका हा सुंदर आणि चांगला चित्रपट प्रचंड गाजतो आहे. त्यातून सगळंच इतकं छान आणि मस्त असताना या अभिनेत्रीनं नक्की आक्षेप का घेतला आहे याबद्दल तुम्हालाही आश्चर्य वाटलेच असेल. तेव्हा पाहुया की नक्की या अभिनेत्रींच म्हणणं काय आहे. अभिनेत्री जूही परमार हिनं इन्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं यावेळी या चित्रपटाविषयी त्यांना जे पसंत पडलं नाही त्याबद्दल या पोस्टमध्ये भाष्य केले आहे. यावेळी ती नक्की काय म्हणाली आहे?
हेही वाचा - 'बाईपण भारी देवा' हीट झाला पण 'महाराष्ट्र शाहीर'; नक्की काय चुकलं? केदार शिंदे म्हणाले...
ही एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. ती आपल्या 10 वर्षांच्या मुलीसह 'बार्बी' हा चित्रपट पाहायला थिएटरमध्ये गेली होती. परंतु पुढच्या काही मिनिटांच ती आपल्या लेकीला घेऊन थिएटर बाहेर आली. यावेळी ती म्हणाली की, प्रिय ‘बार्बी’ सर्वप्रथम मी माझी चूक मान्य करते आणि मग सुरूवात करते. कारण माझ्या 10 वर्षांच्या समायराला (मुलीला) मी तुझा चित्रपट पाहायला घेऊन गेले. हा चित्रपट ‘पीजी-13’ (पॅरेंटल गायडन्स अंडर 13) आहे याकडे मी लक्ष दिले नाही. चित्रपट सुरू झाल्यावर सुरुवातीच्या 10 मिनिटांतच समोर आलेले आक्षेपार्ह भाषा, सीन्स पाहून मला चित्रपटगृहातून बाहेर पडावे लागले. मी माझ्या मुलीला हे काय दाखवले? असा प्रश्न मला पडला. ती तुझा चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक होती; परंतु, प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यावर मला धक्का बसला आणि मी निराश झाले.
सुरूवातीच्या 10 ते 15 मिनिटांत मी बाहेर पडले. अनेक पालक त्यांच्या लहान मुलांसह चित्रपट पाहण्यासाठी आले होते. या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छिते की, तुमच्या चित्रपटाची भाषा १३ वर्षांखालील नाही, तर त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठीही अयोग्य आहे.
चित्रपटगृहातून घरी आल्यावर मी ‘बार्बी’चे प्रोमो तपासले. तेव्हा माझ्या लक्षात आले की आक्षेपार्ह भाषा, सीन्स प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. मग ही लोकांची दिशाभूल नाही का? पण हे केवळ ‘बार्बी’बद्दल नसून आमच्याकडीलसुद्धा निम्म्याहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये खूप अयोग्य कंटेंट दाखवला जातो. तुमच्यापैकी काही जणांना माझे मत पटणार नाही किंवा राग येईल. पण हे पत्र सगळ्या पालकांसाठी आहे. मी केलेली चूक तुम्ही करू नका. कृपया चित्रपट पाहायला जाण्यापूर्वी संपूर्ण खात्री करा.”