सुशांत लवकरच अडकणार होता विवाहबंधनात; वडिलांचा खुलासा
काय म्हणाले के.के. सिंह...
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी गळफास घेवून आपला जीवन प्रवास संपवला. त्याच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. सध्या, त्याने नक्की आत्महत्या का केली असावी.. याचे ठोस कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. त्यांच्या चौकशीच्या माध्यमातून अनेक नव्या गोष्टींचा खुलासा देखील होत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला. सुशांत २०२१ पर्यंत लग्न करणार होता असं त्याच्या वडिलांनी स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले, 'सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. तो प्रत्येक गोष्ट सांगायचा. पण कालांतराने काय झालं कोणास ठावूक.. त्याने आम्हाला त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगणं सोडून दिलं”, असं ते म्हणाले. सुशांतच्या वडिलांना फक्त अंकिता लोखंडेबाबत माहिती होती. त्यांना रिया चक्रवर्तीबद्दल काहीच माहित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुलाखती दरम्यान सुशांतसोबत एकदा बोलणं झालं होतं असं देखील ते म्हणाले. 'कोरोनाचं संकट असल्यामुळे त्याने लग्न करण्याचा निर्णय रद्द केला होता. करोनाचं संकट गेल्यावर एक चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्नाचा विचार करेन असं तो म्हणाला होता.'
सुशांतने त्याच्या वडिलांसोबत साधलेला हा शेवटचा संवाद होता. लग्न कधी करणार हे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले होते. परंतू कोणा सोबत सुशांत लग्न करणार होता हे मात्र त्याने सांगितलं नसल्याचं त्याच्या वडिलांनी स्पष्ट केलं.