मुंबई : दिग्दर्शक करण जोहरने बॉलिवूडला अनेक हीट चित्रपटं दिले आहेत. शिवाय बॉलिवूडमध्ये तो अनेक नवख्या कलाकारांचा गॉडफादर देखील राहिला आहे. पण आता या दिग्दर्शकाला वाटत आहे की, २००१ साली प्रदर्शित झालेल्या 'कभी खुशी कभी गम' चित्रपटाने त्याला चांगलीच चपराक दिली आहे. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तो म्हणाला, ''मुगल-ए-आजम' चित्रपटानंतर आमिर खानचा 'लगान' फरहान अख्तरचा 'दिल चाहता है' या चित्रपटापर्यंत मी बॉलिवूडमध्ये अधिक चांगले चित्रपट साकारत आहे असं मला वाटत होतं. पण 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाने मला मोठी चपराक दिली.' असं वक्तव्य करणने केलं.
 
तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपली पकड धरू शकला नव्हता. त्यामुळे दिग्दर्शक करण जोहर फार त्रासलेला होता. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाची कथा कौटुंबिक चढ-उतारावर आधारलेली होती. 


चित्रपटामध्ये अभिनेता शाहरूख खान, ऋतिक रोशन आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. तर अभिनेत्री जया बच्चन, काजोल, करिना कपूर खान यांची देखील मुख्य भूमिका होती तर राणी मुखर्जी देखील चित्रपटात छोटी भूमिका बजावली होती. 


करण सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये चांगलाच व्यस्त आहे. येत्या काळात करणचे 'दोस्ताना २' आणि 'तख्त' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहेत.