... यामुळे कादर खान यांनी मुलांना बॉलिवूडमध्ये आणलं नाही
काय आहे यामागचं कारण
मुंबई : कादर खान यांच कॅनडातील हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. कादर खान यांच्या निधनाची मुलगा सरफराज यांनी दिली असून कादर खान त्यांची पत्नी हजरा, मुलगा सरफराज आणि नातवंडांसोबत कॅनडात राहत होते.
कादर खान यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा मुलगा सरफराज त्यांच्याोबत होता. कादर खान यांनी बॉलिवूडमध्ये आपलं करिअर करून विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळवली.
बॉलिवूड स्टार या नात्याने कादर खान यांनी कधीच मुलगा सरफराजला लाँच केलं नाही. ते आपल्या मुलाला बॉलिवूडमध्ये सहज एन्ट्री मिळवून देऊ शकत होते. पण त्यांनी तसं केलं नाही.
यामागे कादर खान यांच्या मनातील भावना नेमक्या काय होत्या. हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.
कादर खान लोकप्रिय अभिनेता होते. त्यांच्या घरी अभिनयाला पुरक असं वातावरण होतं. लहानपण सरफराज यांना वाटे की, आपण देखील अभिनय करावा.
त्याच वातावरणाला पाहता सरफराज मोठा झाला. त्याचा या क्षेत्राकडे अधिक कल होता. मात्र कधी सरफराज याने आपल्या मनातील भावना कुणाकडे बोलून दाखवली नाही.
कादर खान यांना कधीच वाटत नसे की, त्यांच्या मुलांनी या क्षेत्रात यावं. त्यांची इच्छा होती की, मुलांनी अगोदर आपलं शिक्षण पूर्ण करावं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरफराजने मनातील इच्छा बोलून दाखवली.
पण कादर खान यांनी आपण काही अमिताभ बच्चन नाही जे तुझ्यावर पैसे लावू शकतात. यावर दोनदा विचार करेन आणि मग सांगेन असं उत्तर दिलं.
या उत्तराने सरफराज यांना खूप वाईट वाटलं परंतु स्वतःच्या जीवावर काही तरी करण्याचा त्याने निश्चय केला. नंतर त्याला नशिबाची साथ मिळाली आणि सिनेमांत काम देखील मिळालं. पण सरफराज स्वतःची ओळख निर्माण करू शकला नाही.
सरफराजने सलमान खानसोबत 'तेरे नाम' आणि 'वॉन्टेड' सिनेमात काम केलं. पण अभिनेता म्हणून त्याला यश मिळालं नाही.
पण तो हताश झाला नाही त्याने स्वतःची ऍक्टिंग अकॅडमी सुरू केली. आणि आज तो बॉलिवूडला नवे चेहरे अभिनयाच्या वर्कशॉपमधून देत आहे.