मुंबई : गरोदरपणात बॉडी शेमिंग करणाऱ्यांना काजल अग्रवालने सडेतोड उत्तर दिलं. तिने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, हा आयुष्याचा अतिशय सुंदर टप्पा आहे. गर्भधारणेदरम्यान स्त्रीमध्ये किती बदल होतात हे देखील यात सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाला जन्म दिल्यानंतर ते पूर्वीसारखे व्हायलाही थोडा वेळ लागतो. अशा परिस्थितीत लोकांनी बॉडी शेमिंग आणि मीम्स बनवू नयेत. जर त्यांच्याकडे वेळ असेल तर जगा आणि जगू द्या. काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूशी लग्न केले. दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत.


काजल अग्रवाल आता आई होणार आहे. तिने नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये त्यांची खिल्ली उडवणाऱ्यांसाठी खास मेसेज शेअर केला आहे. काजलने लिहिले आहे की, मी माझ्या आयुष्यात, शरीरात, घरातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या कामाच्या ठिकाणी सर्वोत्तम बदलांमधून जात आहे.



तसेच काही कमेंट्स, बॉडी शेमिंग आणि मीम्स करून काही उपयोग नाही. कृपया करुणा करायला, जगा आणि जगू द्या.