Kajal Aggarwal लवकरचं आई होणार; `बेबी बंप`सह फोटो शेअर
काजलच्या घरी `कोणी तरी येणार येणार गं...`
मुंबई : अभिनेत्री काजल अग्रवालने (Kajal Aggarwal) नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काजल लवकरचं आई होणार आहे. ही आनंदाची बातमी ऐकून चाहतेही खूप खूश आहेत. काजल नुकतीच पती गौतम किचलूसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. आता ती परत आली आहे. कायम सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या काजलने पतीसोबत बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. फोटो सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये काजल आणि पती अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोमध्ये दोघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. काही दिवसांपूर्वी जेव्हा काजलला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा ती प्रेग्नंट असल्याची शक्यता वर्तवली जात होती पण अभिनेत्रीने याचा नकार दिला होता.
ई-टाइम्सशी बोलताना ती म्हणाली, “मला आता याबद्दल बोलायचे नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन.” आणि आता काजलने स्वतः बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. आनंदाची बातमी कळाल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.