मुलाच्या वाढदिवशी काजोल-अजयच्या खास शुभेच्छा
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मुंबई : अजय देवगन आणि काजोल यांचा मुलगा युग आज नववा वाढदिवस साजरा करत आहे. काजोलने मुलाच्या वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. अजयनेही एक फोटो पोस्ट करत युगला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काजोलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये काजोलचा मुलगा फनी एक्सप्रेशन देताना दिसतोय. या व्हिडिओवेळी तो ३ वर्षांचा होता.
अजयनेही इन्स्टाग्रामवर भावनिक कॅप्शनसह एक फोटो शेयर केलाय. सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काजोल-अजयची मुलं युग आणि न्यासा सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. अजय-काजोल दोघेही सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर करतात.
काजोल अजयसोबत 'तानाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये स्क्रिन शेयर करणार असल्याची चर्चा आहे.