Kajol Kissing Scene : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही काही दिवसांपूर्वी 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटातील काजोलच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. दरम्यान, आता काजोल चर्चेत येण्याचं कारण तिनं या सीरिजसाठी तिच्या करिअरमधला नो-किसिंग पॉलिसी मोडली आहे. आता ही सीरिज कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 'द ट्रायल' असं या वेब सीरिजचं नाव आहे. या सीरिजमध्ये काजोल ही एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच वेब सीरिजसाठी काजोलनं तिच्या करिअरमधील नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोल आधी चित्रपटात बोल्ड भूमिका असतील तर त्यापासून लांब रहाण्याचा प्रयत्न करायची. काजोलनं काही ठराविक चित्रपटांमध्ये इमोशनल आणि रोमान्टिक सीन्स शूट केले. पण ओटीटीवर तिचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. आधी काजोलनं 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटातील तिच्या बोल्ड भूमिकेमुळे चर्चेत होती. आता तर तिनं चक्क किसिंग सीन दिला आहे. तिचा हा वेगळा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. काजोलनं या सीरिजमध्ये दोनवेळा किसिंग सीन दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान ज्यानं तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. तर दुसरा अभिनेता जीशू सेनगुप्ता आहे. त्यानं काजोलच्या पतीची भूमिका साकारली आहे. तर काजोलनं या दोघांसोबत किसिंग सीन दिला आहे. 




काजोलचे हे दोन्ही किसिंग सीन सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत काजोलनं केलेल्या या किसिंग सीनची स्तुती करत आहेत. काजोलनं नो किसिंग पोलिसी मोडीत घातल्यानं तिच्या सगळ्या चाहत्यांना आनंद होईल असं अनेकांनी म्हटलं आहे. 


हेही वाचा : आता नवं काय? Urvashi Rautela ला पुन्हा एकदा आली ऋषभ पंतची आठवण! पाहून नेटकऱ्यांचा संताप


हा चित्रपट ‘द गुड वाईफ’ शोचा रिमेक आहे. मूळ शोमध्ये ज्युलियाना मार्गुइल्स मुख्य भूमिकेत होती. या शोचे जपानी आणि साऊथ कोरियन रिमेक आधीच तयार करण्यात आले आहेत. तर आता हिंदी व्हर्जन नुकताच डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल, जीशू सेनगुप्ता, ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान, कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, गौरव पांडे आणि आमिर अली हे कलाकार आहेत. ही सीरिज आज 14 जुलै रोजी प्रदर्शित झाली असून तुम्ही आता विकेंडला ही सीरिज पाहण्याचा आनंद घेऊ शकता.