मुंबई : 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या बॉलिवूड चित्रपटाला आज 26 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने काजोलने एक ट्विट केलं आहे. मात्र या नंतर तिला शाहरुख खानच्या चाहत्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काजोलने चित्रपटाला 26 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ चित्रपटाच्या शेवटच्या सीनमधील होता, ज्यात सिमरन धावताना राजचा हात धरून ट्रेनमध्ये चढते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विट करणं काजोलला पडलं महागात
हा व्हिडिओ शेअर करत काजोलने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'सिमरनने 26 वर्षांपूर्वी ट्रेन पकडली आणि आम्ही अजूनही प्रत्येकाच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानत आहोत.' काजोलचं हे ट्विट लगेच व्हायरल झालं आणि शाहरुख खानच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेंटचा वर्षाव केला. सोशल मीडिया युजर्स तिला सतत ट्रोल करत असतात.


शाहरुख खानचे चाहते काजोलवर चिडले
शाहरुख खानचे चाहते काजोलवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. एका सोशल मीडिया युजर्सने लिहिलं, 'आर्यन खानला जामीन मिळत नाही, त्याच्याकडून काहीही मिळालं नाही, तुला माहित नाही? लाज वाटते? मैत्री आहे का? 'त्याचबरोबर, आणखी एका सोशल मीडिया युजर्सने लिहिलं की,' शाहरुख खानच्या फ्रेंड काहीतरी लाज बाळगं. ईथे मित्राच्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यासाठी एक ट्विट करत नाही. आणि ईथे डीडीएलजे साजरा करतेय. खरंच हे बॉलिवूड लोक खूप वाईट आहेत.' तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं, 'तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला आधार द्या. त्याला अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.



शाहरुख आणि काजोल डीडीएलजेचे मुख्य कलाकार आहेत
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' (DDLJ) चित्रपटाबद्दल बोलायचे झालं तर, शाहरुख खान आणि काजोल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर फरीदा जलाल, अमरीश पुरी, अनुपम खेर आणि मंदिरा बेदी हेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.