मुंबई : अभिनेत्री काजोल देवगण सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अभिनेत्री नेहमी चाहत्यांच्या संपर्कातही असते. नुकतीच काजोलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टवरून हे स्पष्ट होतं आहे की, तिला तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला फार आवडतं. नुकतच काजोलने तिची सासू आणि सिनेमा निर्माती वीणा देवगणसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी, १९ फेब्रुवारीला काजोलने तिच्या सासूसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. फोटोमध्ये, अभिनेत्री गोल्डन बॉर्डर असलेल्या ऑफ-व्हाइट साडीमध्ये दिसत आहे. तर वीणाने पिवळा सूट-सलवार परिधान केला आहे. फोटोमध्ये दोघंही  कॅमेराकडे बघून पोज देत असल्याचं दिसत आहेत.


काजोलने फोटोसोबत एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिने लिहीलंय की, 'जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा त्याच्यासोबत फक्त सात फेरे घेऊ नका. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचाही यात सहभाग आहे, माझ्यासाठी नेहमीच माझ्यासोबत उभी असणारी माझी सासू मला मिळाल्याचाआनंद आहे. मला असं वाटतं की, मी माझ्या पतीपेक्षा तिच्या जवळ आहे. या अद्भुत स्त्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वीणा देवगण.


काजोलने नुकतीच ही पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यावर 1 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. पोस्टच्या कमेंट सेक्शनवर कमेंट करून चाहते काजोलच्या सासूचं कौतुक करत आहेत  वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.



अजय देवगणची आई वीणा प्रसिद्ध एक्शन कोरिओग्राफर वीरू देवगणची यांची पत्नी आहे. ती चार मुलांची आई आहेत. त्यांनी 'दिल क्या करे' या चित्रपटातून निर्माता म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.