`विवाहबाह्य संबंध...`, ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला?
Kajol Gave Suggestion to Aishwarya and Abhishek : काजोलनं एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकला लग्न टिकवून ठेवण्यासाठी खास सल्ला दिला आहे.
Kajol Gave Suggestion to Aishwarya and Abhishek : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. ते दोघे लवकर विभक्त होणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्या तरी त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असं असलं तरी अभिषेकविषयी बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. या सगळ्या चर्चा या अभिषेक आणि निमरत कौरविषयी सुरु होत्या. त्यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आल्याचे म्हटले जाऊ लागले. त्यात आणखी अनेक गोष्टी या समोर येत आहेत. इतकंच नाही तर अभिषेक आणि ऐश्वर्या रायच्या लग्नाचे जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नातील किंवा त्या संबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशात एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत अभिनेत्री काजोल त्यांना सल्ला देताना दिसत आहे. हा व्हिडीओ कॉफी विथ करण 2007 मधला आहे. त्यात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी आले होते. यावेळी रॅपिड फायर राउंड दरम्यान, काजोलकडून एक सल्ला मागितला की 'ती ऐश्वर्या आणि अभिषेकला लग्न टिकवून ठेवण्यासाठी काय सल्ला देणार?' त्यावर काजोलनं सांगितलं की 'या जोडप्यानं कधीच 'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपट पाहू नये.'
का दिला काजोलनं हा सल्ला?
दरम्यान, 'कभी अलविदा ना कहना' असा एक चित्रपट आहे ज्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, प्रीति झिंटा आणि अमिताभ बच्चन हे कलाकार आहेत. या चित्रपटात धोका आणि विवाहबाह्य संबंध यावर आधारीत आहे.
हेही वाचा : ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक
ऐश्वर्या आणि अभिषेकच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टींच्या चर्चा रंगल्या आहेत. पण ते दोघं किंवा त्यांच्या कुटुंबातील अनेकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली आहे. अभिषेकनं एकदा म्हटलं होतं की 'त्याच्या आजुबाजूला सुरु असलेल्या गोष्टींवर किंवा चर्चांवर तो प्रतिक्रिया करत नाही किंवा त्यावर त्याला शांत राहणं पसंत करतो.' तर अभिषेकनं नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'आय वॉन्ट टू टॉक' असं आहे.