ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं ऐश्वर्याच्या माहेरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचं कारण आलं समोर... 

दिक्षा पाटील | Updated: Oct 24, 2024, 05:45 PM IST
ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो. ऐश्वर्या रायसोबत होणारे वाद आणि अभिनेत्री निम्रत कौरशी त्याच्या जवळीकतेनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. ऐश्वर्या रायच्या माहेरी असलेल्या कार्यक्रमात अभिषेक सहभागी झाला नाही, यावरून पुन्हा त्यांच्या नात्यावर चर्चा सुरू झाल्या. लोकांना वाटलं होतं, की त्या कार्यक्रमामध्ये अभिषेक देखील दिसणार आहे. पण असं काही झालं नाही. अभिषेक या कार्यक्रमात पोहोचू शकला नाही या मागचं कारण काय आहे अशी विचारणा होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

हा कार्यक्रम ऐश्वर्याच्या चुलत भावाचा वाढदिवस होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. याचे काही फोटो देखील समोर आले. ज्यात ऐश्वर्यासोबत तिची आई, भाऊ, वहिनी आणि आराध्या फार आनंदी दिसत आहेत. मात्र, अभिषेकची अनुपस्थिती सर्वांना खटकली. प्रत्यक्षात अभिषेक बच्चनच्या आजी अर्थातच जया यांच्या आई इंदिरा बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचीच भेट घेण्यासाठी अभिषेक बच्चन भोपाळला गेला होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांच्या आई इंदिरा यांची मान फ्रॅक्चर झाली आहे. यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. अशात आपल्या लाडक्या आजीची भेट घेण्यासाठी रात्री उशीराच्या फ्लाईटने भोपाळला गेला होता. 'इंडिया टुडे' च्या वृत्तानुसार, इंदिरा सध्या बऱ्या आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्या बऱ्यापैकी खात-पित आहेत. सोबतच अभिषेक सुद्धा त्यांची काळजी घ्यायला आहेच. अशात ज्युनिअर बच्चनच्या आजी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत. एकीकडे अभिषेक बच्चनच्या मनात आपल्या आजीविषयी एवढं प्रेम पाहून सोशल मीडियावर त्याचं फार कौतुक केलं जातंय. तर दुसरीकडे दुसऱ्यांच्या विघ्नात आनंद शोधणाऱ्या वृत्तीचे लोक तो केवळ ऐश्वर्याच्या नातेवाईकाच्या कार्यक्रमात पोहोचला नसल्याने त्याला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा : इथं परफेक्शनीस्ट, तिथं साऊथ सुपरस्टार; 'गजनी 2' मध्ये कोण बाजी मारणार? एकाच्या यशाचा दुसऱ्याला फटका?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेकच्या आजींना मानेचा त्रास यापूर्वी देखील होता. सोबतच इतरही काही आजार आहेत. इंदिरा यांची सर्जरी करून त्यांच्या हृदायत पेसमेकर सुद्धा लावण्यात आलाय. अशात फ्रॅक्चर झाल्याने कुटुंबियांची चिंता वाढली होती. याच दरम्यान आपल्या आजीची काळजी घेत असताना अभिषेकने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला. 'आय वॉन्ट टू टॉक' असं या चित्रपटाचं नाव आहे. त्याशिवाय तो आणखी 'बी हॅप्पी' या चित्रपटात देखील दिसणार आहे.

About the Author