मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा काजोल तिच्या मुलासोबत देखील दिसते. नुकताच तिचा मुलगा युगसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी काजोलला ट्रोल केलं आहे. 


आणखी वाचा : Good News पे गुड न्यूज! भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सलमानच्या चाहत्यांचा आनंद होणार द्विगुणित!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत काजोल मुलगा (Kajol Son Yug) युगसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला आल्याचे समोर आले आहे. काजोलनं रात्री देखील सनग्लासेस घातले होते. त्यामुळे युगनं तिचा हात धरला आणि तिला गाडी पर्यंत घेऊन आला. यामुळे काजोलला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. दरम्यान, फक्त काजोल एकटी नाही की जिला रात्री सनग्लासेस घातल्यामुळे ट्रोल करण्यात आले, या आधीही अनेक सेलिब्रिटींना रात्री सनग्लासेस घातल्यामुळे ट्रोल करण्यात आले आहे.


आणखी वाचा : मलायकानंतर मानुषी छिल्लरचं ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशूट, नेटकरी हैराण


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी
सोशल मीडियावर काजोलचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काजोलला ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला, 'काजोलनं काळा चष्मा काढला असता तर तिला हात पकडण्याची गरज पडली नसती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रात्री सनग्लासेस लावण्याची काय गरज.' अशा अनेक कमेंट करत अनेकांनी काजोलला ट्रोल केले आहे. 


आणखी वाचा : नोरा, Jacqueline मागोमाग 'ही' मराठी अभिनेत्रीसुद्धा सुकेश चंद्रशेखरच्या जाळ्यात, पाहा कुठे फसली


काजोल शेवटी पती अजय देवगणसोबत 'तान्हाजी' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या दोघांनी ऑन स्क्रिन केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. 90 च्या दशकात काजोल ही टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. सुपरस्टार शाहरुख खानसोबतची तिची जोडी ही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.