काजोलला सतावतेय वडिलांची आठवण; भावूक होत पोस्ट शेअर, म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे
मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान मिळवणारी बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिला आज कोण ओळखत नाही. काजोल सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या सुंदर फोटोंनी लोकांची मने जिंकते पण यावेळी तिने तिच्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. अलीकडेच वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त काजोल सोशल मीडियावर खूपच भावूक झाल्याचं दिसलं. तिने तिचे वडील शोमू मुखर्जी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आणि तिला त्यांची किती आठवण येते हे सांगितलं.
खरंतर काजोलने वडील शोमू मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा फोटो शेअर केला होता. या फोटोत काजोल तिच्या वडिलांसोबत हसत हसत कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे. बाप आणि मुलीचं गोड नातं फोटोत पाहायला मिळतं. हा फोटो शेअर करत काजोलने लिहिलं की, '14 वर्षांपूर्वी तुम्ही मला सोडून गेलात, आजही मला तेच वाटत आहे. मिस यू'. यासोबतच काजोलने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'वडिल आणि मुलगी, नेहमी तुमच्यासाठी बेबी'
अलीकडेच, काजोलने तिच्या एका मुलाखतीत आई तनुजा आणि वडील शोमूच्या विभक्त होण्याबद्दल सांगितलं, ज्यामध्ये काजोल म्हणाली, 'मी साडेचार वर्षांची असताना माझे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले होते, आई-वडिलांसोबत राहणारी मुलं पाहून मला कधी कधी विचित्र वाटायचं, पण मी माझ्या आई-वडिलांवर वेगळं असतानाही खूप प्रेम केलं आहे आणि एकत्र असतानाही खूप प्रेम केलं आहे.
काजोलची आई आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तनुजाने 1973 मध्ये बंगाली फिल्ममेकर शोमू मुखर्जीसोबत लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुली आहेत. बॉलीवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये मोठी मुलगी काजोलचा समावेश होतो, तर तीच धाकटी मुलगी तनिषानेही हिंदी चित्रपटसृष्टीत हात आजमावला आहे. काजोलने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत आणि आज ती मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.