मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपवर प्रतिक्रिया दिली आहे. काजोलने सेक्शुअल हरॅसमेंट हे इंडस्ट्रीतलं सत्य असल्याचं म्हटलं आहे. काजोलने म्हटलं की, 'तिने जे ही म्हटलं ते सत्य आहे आणि हे फक्त याच इंडस्ट्रीमध्ये नाही तर प्रत्येक जागी होतं. मी कधी माझ्या करिअरमध्ये सेक्शुअल हरॅसमेंटचा सामना नाही केला. पण कधी असं झालं असतं तर मी यावर नक्कीच बोलली असती.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तनुश्री दत्ताने दिग्गज अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 10 वर्षापूर्वी सिनेमाच्या सेटवर असभ्य वर्तणूकीचे आरोप केला आहे. यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ उडाली होती.


'सेक्शुअल हरॅसमेंट इंडस्ट्रीतलं सत्य'


एनडीटीव्ही दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादावर बोलतांना म्हटलं की, मला नाही माहित की आरोप किती खरं आणि किती खोटे. पण इंडस्ट्रीमध्ये मी अनेक अशा घटना ऐकल्या आहेत. माझ्या समोर असं झालं असतं तर मी नक्की बोलली असती.


बॉलिवूडमध्ये #MeToo ची सुरुवात


तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये 2 गट पडले आहेत. बॉलिवूडमध्ये #MeToo ची सुरुवात झाली आहे. यावर बोलताना काजोलने म्हटलं की, '#MeToo आंदोलनची मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही स्वत:साठी उभे राहिले. तुम्ही लोकांना आपल्यापाठी उभे राहतांना पाहत आहात आणि तुम्ही स्वत:साठी उभे आहात.'