Kajol Durga Puja Mandap Video : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही तिचा आगामी चित्रपट किंवा प्रोजेक्टमुळे चर्चेत नाही तर त्यासोबत तिच्या रागामुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमधला एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती दुर्गा पूजा पंडालमध्ये कन्या आणि तिथे आलेल्या भक्तांना जेवण वाढताना दिसते. मात्र, यावेळी काजोलनं असं काही केलं ज्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दुर्गा पूजेतील आहे. त्याशिवाय आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात काजोल ही तिथे आलेल्या भक्तांना जेवण वाढताना दिसत आहे. या दोन्ही व्हिडीओंमध्ये कधी ती चिडचिड करते तर कधी कोणी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना एका चाहत्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी काजोलचा बॉडीगार्ड देखील त्यांना बोलू लागला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हा व्हिडीओ नॉर्थ बॉम्बे सर्बोजनिन दुर्गा पंडाल मधील आहे. हे पंडाल काजोल, राणी मुखर्जी आणि त्यांचं कुटुंब असं मिळून सांभाळतात. दुर्गा देवीचे स्वागत सिंदूर खेलानं करतात आणि इथे येणाऱ्या सगळ्या भक्तांसाठी महाप्रसाद असतो. दरवेळी दुर्गा पंडालला ट्यूलिप स्टार हॉटेलमध्ये लावण्यात येतं. पण आता जुहूच्या SNDT यूनिव्हर्सिटीच्या ग्राऊंडमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

दुर्गा पंडालमध्ये काजोल ही तिथे आलेल्या भक्तांना स्वत:च्या हातानं जेवण वाढताना दिसते. त्यासोबत ती स्वत: काही खाताना दिसली. तिचं तोंड सुरु असतं. जेव्हा एका श्रद्धालूनं त्याच्या फोनमध्ये काजोलचा व्हिडीओ रेकॉर्ड करणं सुरु केलं तेव्हा काजोलनं लगेच त्याला थांबवलं आणि कॅमेरा बंद केला. काजोल त्याला कॅमेरा बंद करण्यास सांगते तर तिच्या तोंडाकडे इशारा करते की ती काही तरी खाते. हे पाहताच काजोलचा बॉडीगार्ड देखील तिथे पोहोचला आणि व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास त्यानं नकार दिला. तो त्या व्यक्तीला ओरडला आणि इतरांना देखील व्हिडीओ शूट करू नका असं सांगितलं. 


हेही वाचा : 'मला दाऊद पण घाबरतो!' तुम्ही काय... गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसला घाबरवलं?


काजोलच्या या व्हिडीओवर लोकं खूप काही कमेंट करत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'आजकाल काजोलकडून खूप निगेटिव्ह एनर्जी येते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिच्या चेहऱ्यावर अॅटिट्यूड दिसतो. लोकांनी ही इतकी का आवडते हे कळत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ही बाई फार उद्धट आहे, लोकांना जेवण वाढत असताना स्वत: का खाते?' आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'हे खूप वाईट होतं. मी तर अशा महिलेच्या हाथानं कधी जेवणार पण नाही.'