Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा लोकप्रिय कॉम्ट्रोवर्शियल शो 'बिग बॉस 18' नुकताच सुरु झाला असून सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या या सीझनची टॅग लाइन 'टाइम का तांडव' आहे. घरात आल्या आल्या स्पर्धकांचं एकमेकांशी वाद आणि भांडणं सुरु झाली आहेत. टीआरपीमध्ये हा शो कमालीचं काम करतोय. घरात नॉमिनेशनची प्रक्रिया सुरु झाली असून त्यासाठी नॉमिनेशन टास्क देखील झालेत. ज्यात चाहत पांडे आणि विवियन डीसेना यांच्यात भांडण झालं. तर वकील गुणरत्न सदावर्ते यांचं असं रुप पाहायला मिळालं, जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं.
बिग बॉस 18 चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस बोलताना दिसत आहेत की मी अविनाश, करण आणि ईशाला एक विशेष अधिकार देणार आहे की ते तीन सदस्यांना निवडतील जे तुरुंगात बंद राहतील. त्यावर तिघांनी म्हणाला, गुणरत्न सदावर्ते यांचं नाव घेतलं आणि हे ऐकताच गुणरत्न सदावर्ते संतापले. त्यांनी तुरुंगात जाण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं की तुरुंगात जाण्यापेक्षा मी नॉमिनेट होणं योग्य समजेन.
इतकंच नाही तर गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉसला धमकी दिली. जेव्हा बिग बॉस यांनी गुणरत्न सदावर्ते यांना सांगितलं की त्यांना तुरुंगात जावं लागेल. तर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, कोणीच मला तुरुंगात टाकू शकत नाही. मला सरकार घाबरते. दाऊद इब्राहिम घाबरतो. हे ऐकूण बिग बॉसही शांत झाले. सोशल मीडियावर गुणरत्न सदावर्ते यांचं हे वक्तव्य व्हायरल झालं आहे. हे पाहून गुणरत्न यांच्या या वागणुकीव सलमान खानचं काय प्रतिक्रिया असणाऱ्या याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
हेही वाचा : लागोपाठ 12 फ्लॉप, करिअरवर लागलेला 'तो' डाग मिटवण्यासाठी अमिताभ यांना लागला 25 वर्षाचा काळ
नेटकऱ्यांनी गुणरत्न यांचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. लोकं त्यांना विनोदी आणि साफ मनाचे म्हणत आहेत. इतकंच नाही तर देवोलीना भट्टाचार्जीनं एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. 'गुणरत्न रॉक, बिग बॉस शॉक' असं कॅप्शन देवोलीनानं या पोस्टवर दिलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'खरं मनोरंजन तर गुणरत्न सदावर्ते करत आहेत. त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे आणि ते बेधडक आहेत. बिग बॉस देखील त्यांना काही करु शकले नाहीत. यावेळी बिग बॉसमध्ये खरंच कोणता दमदार वकील आला आहे.'
LIVE|
THA
7/1(1.3 ov)
|
VS |
INA
|
| Full Scorecard → | ||
|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.