मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, ज्यातून बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटीही सुटू शकलेले नाहीत, बॉलिवूड अभिनेत्री काजोल हीला देखील कोरोनाची लागण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहे, ज्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर दिली आहे. ही पोस्ट येताच चाहते काजोलला स्वतःची काळजी घेऊन लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.


काजोलने मुलीचा फोटो शेअर करत माहिती दिल्याने अनेकांना प्रश्न पडला की तिने न्यासाचा फोटो का शेअर केला आहे. तर त्याचं कारण ही काजोलने सांगितलं आहे.


बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिची मुलगी न्यासाचा फोटो शेअर करताना कोरोना पॉझिटिव्हची बातमी दिली आहे. काजोलने लिहिले, 'मी कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. रुडॉल्फ सारखे माझे नाक कोणी पाहू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून जगातील सर्वात सुंदर स्माईल पाहूया. पोस्टमध्ये काजोलने सांगितले की, ती तिची मुलगी न्यासाला खूप मिस करत आहे.



काजोलच्या या पोस्टवर सर्वजण तिच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्याचवेळी अभिनेत्री प्रियांका चोप्राने काजोलची मुलगी न्यासा हिचे वर्णन स्टनिंग असे केले आहे.


फोटोमध्ये, न्यासा तिच्या हातावर मेंदी अंगठी फ्लॉंट करताना खरोखर सुंदर दिसत आहे. काजोल तिची मुलगी न्यासासोबत सिंगापूरमध्ये होती. न्यासाच्या अभ्यासामुळे काजोल तिच्यासोबत तिथेच राहिली. मात्र, यादरम्यान काजोलही मुंबईत अनेकदा स्पॉट करण्या आलंआहे.