मुंबई : सध्या बी-टाऊनमध्ये दुर्गापूजा जोरात सुरू आहे. सेलेब्स भक्तीच्या रंगात रंगलेले दिसतायेत आणि दुर्गा पूजेसाठी दुर्गा पंडालमध्ये एकापेक्षा जास्त नेत्रदीपक रूपात पोहोचत आहेत. यामध्येच अभिनेत्री काजोल आणि जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सला हसू आवरता आलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जया बच्चन यांच्यावर काजोल ओरडली
वास्तविक, दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेत्री काजोल दुर्गापूजेला हजेरी लावण्यासाठी पोहोचल्या होत्या. यादरम्यान दोघीही एकमेकांना भेटल्या आणि पापाराझींना पोजही दिल्या. यादरम्यान काजोलची ही मस्ती कॅमेऱ्यात कैद झाली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काजोल जया बच्चन यांच्यावर ओरडत आहे आणि त्यांना मास्क काढण्यास सांगत आहे.


जया बच्चन यांनाही हसू आवरलं नाही
जया बच्चन यांचं हास्य मास्कच्या मागे लपलेलं दिसतं. काजोलची आज्ञा मानून आणि तिला खूश करण्यासाठी जया बच्चन त्यांचा मास्क काढून पोझ दिली. दोघांमधील हे क्यूट बाँडिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यासोबतच अभिनेत्री राणी मुखर्जीही दुर्गा दर्शनासाठी या पंडालमध्ये पोहोचली होती. काजोल आणि राणी मुखर्जी यांनीही एकमेकांसोबत जोरदार पोज दिल्या आणि फोटो क्लिक केले. राणी मुखर्जी, जया बच्चन आणि काजोलचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.