मुंबई : दिग्दर्शक करण जोहरच्या मल्टीस्टारर  'कलंक' सिनेमाचे लुक समोर येत आहेत. महिला दिनाचे औचित्य साधत करणने अभिनेत्री आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हाची सिनेमातील एक झलक प्रदर्शित केली. सिनेमात धक धक गर्ल एका आनोख्या भूमिकेत दिसत आहे. सिनेमात 'बहार बेगमच्या' भूमिकेत अभिनेत्री माधुरी दीक्षित झळकणार आहे. 'टोटल धमाल' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करून झाल्यानंतर माधूरी 'बेगम' म्हणू़न चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्टचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाल्यानंतर तिची तुलना जोधा अकबर सिनेमातील अभिनेत्री एश्वर्या राय आणि 'पद्मावती' सिनेमातील अभिनेत्री दीपिका पादुकोन सोबत केली जात आहे. या फोटो मध्ये आलियाने भरपूर दागीने घातले आहेत आणि लाल रंगाच्या घागऱ्यात ती अप्रतिम दिसत आहे. सिनेमात सोनाक्षी सिन्हा 'सत्या'च्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक करण जोहरने खुद्द त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन या तीन तारकांचे कौतुक केले. 



बहुप्रतिक्षीत 'कलंक' सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. पण एप्रिल महिन्यातील कोणत्या दिवशी सिनेमा सिनेमागृहात दाखल होईल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सिनेमात वरून धवन 'जफर' भूमिका साकारणार आहे तर आदित्य रॉय कपूर 'देव चौधरी'च्या भूमिकेत झळकणार असून संजय दत्त 'बलराज चौधरीची भूमिका बजावतात दिसणार आहे. सिनेमाची कथा भारत - पाकिस्तानच्या फाळणीवर बेतलेली आहे.