मुंबई : अभिषेक वर्मन दिग्दर्शित 'कलंक' पुढच्या महिन्यात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कोणतीही कमी ठेवत नाही. चित्रपटाचं एक-एक पोस्टर प्रदर्शित करण्यात येत आहे. या प्रदर्शित होणाऱ्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. माधुरी दीक्षित, आलिया भट्ट, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर अशी अतिशय प्रभावशाली स्टारकास्ट चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा 'कलंक' चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. आलिया भट्ट (रूप) आणि सोनाक्षी सिन्हा (सत्या) असे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये आलिया आणि सोनाक्षीचा भव्य, राजेशाही लुक दिसत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरून नवीन पोस्टर शेअर केले आहेत. 



 



काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या 'कलंक' चित्रपटाच्या टीझरने रेकॉर्डब्रेक केला असून २४ तासांत २६ मिलियनहून अधिक वेळा टीझर पाहिला गेला आहे. चित्रपटाच्या टीझरचे प्रेक्षकांकडून चांगलेच कौतुक केले जात आहे. चित्रपटाचा पहिलाच टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये संपूर्ण चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. 'कलंक' चित्रपटातून माधुरी दीक्षित आणि संजय दत्त ही जोडी अनेक वर्षांनंतर पुन्हा सिल्व्हर स्क्रिनवर पाहायला मिळणार आहे.