नवी दिल्ली : बॉलीवूडची सुंदर आणि हॉट अॅक्ट्रेस मेघना नायडू कोण विसरेल? २००० आपल्या म्युजिक व्हिडियोतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली. 'कलिओ का चमन' या गाण्याने जगप्रसिद्ध झालेली मेघना आता ३५ वर्षांची झाली आहे.  १९ सप्टेंब १९८२  साली विजयवाडा येथे जन्मलेली ही अभिनेत्री आता बॉलिवूड इंडस्ट्रीत अॅक्टीव्ह दिसत नाही. पण सोशल मीडियाद्वारे ती आपल्या चाहत्यांसमोर येत असते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही तेलगू आणि कन्नड चित्रपटात काम केल्यानंतर तिने 'हवस' (२००४) या बॉलीवूड चित्रपटात दिसली. 



त्यानंतर 'एके ४७', द मनी गेम', 'क्रश', 'पाऊस', ' 'माशूका', 'रेन', 'बैड फ्रेंड', 'ऐटः द पावर ऑफ शनि', 'रिवाज', 'इश्क दीवाना' अशा सिनेमांत दिसली. 
बॉलिवूडसोबत ती दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतही दिसून येत होती. 
'क्या कूल है हम' मध्ये छोट्या भुमिकेत दिसली होती.  'खतरों के खिलाड़ी', 'जोधा अखबर', 'अदालत' और 'ससुराल सिमर का' या टीव्ही शो मध्येही दिसली होती.  
 मेघना इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह आहे. आपल्या लाईफमधील सर्व अपडेट ती चाहत्यांना इंस्टाग्रामवर देत असते.



मेघनाचेअद्याप लग्न झाले नाहीए. तिच्या लव लाईफ बद्दल काही माहिती समोर आली नाही. 



इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये ती स्वत: ची ओळख अभिनेत्री, प्रवासी, जंकी, डान्सर आणि शिक्षक अशी करुन देत आहे.



मुंबई, गोवा, दुबई आणि लिसबनमध्ये ती जास्त वेळ घालवत असल्याचेही ती सांगत असते.