Kalki OTT Release Date: 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांचा हा पौराणिक आणि विज्ञान कथा असणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला चित्रपटाने कमाईच्या बाबतीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हा चित्रपट OTT वर रिलीज होणार आहे. 'कल्कि 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक नवीन पाऊल उचलले आहे. एकाच दिवशी हा चित्रपट दोन वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. हा हिंदी चित्रपट कधी आणि कुठे बघायला मिळणार आहे ते जाणून घ्या.


कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? 


दिग्दर्शक नाग अश्विनचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या हिंदी ओटीटी रिलीजची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. त्यामुळे तुमचा वीकेंड आणखी रोमांचक करण्यासाठी कल्किच्या ओटीटी रिलीजच्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे. 


जर तुम्ही कल्किच्या हिंदी ओटीटी रिलीजवर नजर टाकली तर हा चित्रपट 22 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.  त्यामुळे नेटफ्लिक्स इंडियाने चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज करून ही माहिती दिली आहे. तर आता 22 ऑगस्ट रोजी प्रभासचा कल्कि 2898 एडी हिंदीमध्ये पाहण्यासाठी सज्ज व्हा. 



या OTT प्लॅटफॉर्मवर देखील होणार प्रदर्शित 


नेटफ्लिक्स व्यतिरिक्त, Amazon Prime Video ने 'कल्कि 2898 एडी'च्या OTT रिलीजसाठी 22 ऑगस्टचा स्लॉट बुक केला आहे. हिंदी व्यतिरिक्त कल्कि तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्राइम व्हिडीओवर ऑनलाइन प्रदर्शित होईल. 


'कल्कि 2898 एडी' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे बजेट 600 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 1100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.