नैसर्गिकरित्या पाण्यात बाळाला जन्म देणार `ही` बॉलिवूड अभिनेत्री
अभिनेत्री पाच महिन्यांची गर्भवती आहे.
मुंबई : अनुराग कश्यपची पहिली पत्नी आणि अभिनेत्री कल्कि केक्ला लवकरच आई होणार आहे. सध्या तिच्या सुपरहीट वेबसीरिजमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. त्याचप्रमाणे तिच्या नात्याच्या चर्चाही चांगल्याच रंगत आहेत. ती बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यांच्या घरी लवकरच एका नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. आपण आई होणार असल्याची गोड बातमी खुद्द कल्कीने चाहत्यांना सांगितली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपण आई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कल्की बॉयफ्रेंड गाय हार्शबर्गच्या बाळाला जन्म देणार आहे. कल्की पाच महिन्यांची गर्भवती आहे. या मुलाखतीत तिने एक खास खुलासा देखील केला आहे.
ती म्हणाली की, 'गोव्याच्या एका स्थानिक निसर्गोपचार जन्म केंद्रात मी पाण्यात माझ्या बाळाला जन्म देणार आहे. माझ्या बाळाचा जन्म नैसर्गिकरित्या व्हावा असं मला वाटतं. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.' कल्की तिच्या बॉयफ्रेंडसोबत सतत फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
२०११ साली कल्किने निर्माता अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१५ रोजी त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली.