मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री कल्कि केक्लाने आपल्या नव्या जीवन प्रवासाला सुरूवात केली आहे. रविवारी तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. कल्किने २०१९ रोजी ती गर्भवती असल्याची माहिती चाहत्यांना दिली होते. बॉयफ्रेंड Guy Hershberg च्या बाळाला कल्किने जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर ती फार खुश आहे. आनंदाला दुजोरा देत तिने सोशल मीडियावर मुलीची पहिली झलक शेअर केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या छोट्या गोंडस पायांचे ठसे इन्स्टाग्रावर पोस्ट करत तिने मुलीच्या नावाची घोषणा केली. तिने तिच्या चिमुकलीचे नाव 'Sappho' असं ठेवलं आहे. मुलीची पहिली झलक आणि तिचं सुंदर नाव जाहीर करत तिने आई होण्याचा अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला. 



आई होण्याचा सुंदर अनुभव शेअर करत ती म्हणाली, 'प्रत्येक स्त्रीचा आदर करायलाच हवा. बाळाच्या जन्मावेळी तिला असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग ती नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देण्याची प्रक्रिया असो किंवा सी- सेक्शन. तरी सुद्धा स्त्रीला सन्मान मिळत नाही.' प्रत्येक स्त्रीला आदर मिळाला पाहिजे अशा भनवा तिने व्यक्त केल्या. 


ती पुढे म्हणाली, 'या ९ महिन्यांच्या कालावधीत शारीरिक आणि मानसिक स्वरूपात अनेक नव्या अडचणींचा सामना करावा लागतो. आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाईला आपण एक भाग आहेत. त्यामुळे एकमेकांसोबत आदर आणि प्रेमाने वागायला हवं.' अशा आशायच्या भावना तिने मुलीच्या जन्मानंतर व्यक्त केल्या आहेत. 


कल्किने वॉटर बर्थच्या माध्यमातून गोव्यात तिच्या बाळाला जन्म दिला आहे. सांगायचं झालं तर खुद्द कल्किचा जन्म देखील गोव्यातच झाला होता.