Kamal Hassan Health Update : दाक्षिणात्य अभिनेता कमल हासन (Kamal Hassan) ही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. सध्या कमल हासन यांची प्रकृती खालावली आहे. रिपोर्ट्नुसार, कमल हसान यांना बुधवारी खूप ताप आला आहे. त्यानंतर कमल यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण, काही रिपोर्ट्समध्ये कमल यांची प्रकृती ठीक असल्याचा दावाही केला जात आहे. फक्त ते रुटीन चेकअप करण्यासाठी गेल्याचे म्हटले जात आहे. (Kamal Hassan Hospitalised)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, याआधी 2021 मध्ये त्यांना कोरोनाची (Kamal Hassan Covid) लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. खुद्द कमल यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. कमल अमेरिकेतून 'हाऊस ऑफ खद्दार' क्लोदिंग लाइन लाँच करून परतले आहेत. त्याचवेळी कमल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये खुलासा केला होता की, अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांना थोडा खोकला झाला होता. यावेळी त्यांनी सर्वांना सावध राहण्याचे आवाहन करून कोरोना अजून गेलेला नाही असं सांगितलं. 



हेही वाचा : 'कस्टडी' चित्रपटाचं पोस्टर हॉलिवूडची कॉपी; वाढदिवसाच्या दिवशी Naga Chaitanya च्या चाहत्यांनी सुनावलं


दरम्यान, याआधी जानेवारी 2021 मध्येही कमल यांच्या उजव्या पायाच्या हाडात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. रिपोर्ट्सनुसार, हा संसर्ग काही वर्षांपूर्वी झालेल्या एका दुखापतीमुळे झाला होता. त्याचवेळी शस्त्रक्रियेनंतर कमल यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. (Kamal Haasan admitted to Chennai hospital due to Fever Latest News Marathi)