कमल हसन यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ल्याचा प्रयत्न, पण.....
हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : तामिळनाडूतील मक्कल निधी मय्यम (एमएनएम) चे प्रमुख आणि अभिनेता कमल हसन यांच्यावर रविवारी हल्ला झाला आहे. एका युवकाने कमल हसन यांच्यावर हल्ला केला आहे. हासन कांचीपुरम येथे निवडणुक प्रचारानंतर कमल हसन एका हॉटेलमध्ये जात होते. तेव्हा ही हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारी ही व्यक्ती कमल हसन यांचा चाहता असल्याचं सांगण्यात येत आहे.
पक्षाच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हसन यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र कमल हसन यांच्या गाडीला जबर फटका बसला आहे. एमएनएमचे नेते एजी मौर्या यांनी ट्विट करून दिली ही माहिती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की,'हल्ला करणाऱ्या युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.'
आरोपी युवकाने मद्य प्राशन केल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर एमएनएमच्या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेने या युवकाला बेदम मारहाण केली. ज्यानंतर पोलिसांनी त्या हल्लेखोराला रुग्णालयात दाखल केलं.
कमल हसन तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर हॉटेलला निघाले होते. तेव्हा नशेच्या धुंदीत असलेल्या एका व्यक्तीने कमल हसन यांची कार रोखण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. यानंतर कारचा दरवाजा मोठ्याने उघडण्याचा प्रयत्न देखील केला. यानंतरच त्याची कार्यकर्त्यांकडून जोरदार पिटाई झाली.