मुंबई : सुप्रिय कोर्टाने शुक्रवारी केरळच्या सबरीमाला मंदिराबाबत ऐतिहासिक निर्णय सुनावला. या निर्णयानुसार आता सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे. पाच न्यायाधिशांच्या संविधान पीठाद्वारे 4-1 अशा बहुमाताने हा निर्णय घेण्यात आला. केरळच्या शबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्षे वयाच्या महिलांना मासिकपाळी दरम्यान प्रवेशबंदी विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. मंदिरात महिलांना प्रवेश नाकारता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना म्हटलंय. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय सुनावलाय. 


अभिनेता कमल हासनने दिली ही प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता राजनेता कमल हासन या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याने म्हटलं की, हा खूप चांगला निर्णय आहे. मी कधीच कोणत्या मंदिरात जात नाही. आणि ज्या लोकांना मंदिरात जाण्याची इच्छा असते त्यांना याची परवानगी मिळाली पाहिजे. प्रत्येकाची आस्था आणि विश्वास असतो त्यामुळे कुणालाही आपण असा विरोध करू शकत नाही. 



प्रकरणात पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठातील एकमेव महिला न्यायमूर्ती इंदु मल्होत्रा यांनी मात्र आपलं वेगळं मत नोंदवलंय. त्यांनी आपला निर्णय सुनावताना म्हटलं की 'शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जाऊ नये. कोर्टानं लोकांच्या धार्मिक भावनांचाही आदर करायला हवा. हा निर्णय केवळ शबरीमाला मंदिरापर्यंत सीमित राहणार नाही तर याचा मोठ्या व्यापक परिणाम होऊ शकेल'. तर्कशुद्धतेची कल्पना धार्मिक मुद्यांमध्ये आणले जावू नयेत, असंही इंदू मल्होत्रा यांनी म्हटलं. सतीसारख्या समाजविघातक प्रथा सोडल्या तर कोणत्या धार्मिक गोष्टींवर बंदी आणावी किंवा आणली जाऊ नये, यांसारख्या गोष्टींत कोर्टानं हस्तक्षेप करू नये, असं मल्होत्रा यांचं मत होतं.