नवी दिल्ली : ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये जितक्या लवकर प्रसिद्ध मिळते, तितक्याच लवकर लोक विसरुनही जातात. 'कामसूत्र ३D'मधून प्रसिद्ध झोतात आलेली अभिनेत्री सायरा खानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. परंतु बॉलिवूडमधून कोणत्याही कलाकाराने या घटनेवर दुख: व्यक्त केलं नाही. शक्रवारी सकाळी सायरा खानचं निधन झालं. 'कामसूत्र ३D'मध्ये शर्लिन चोप्राला रिप्लेस केल्यानंतर सायरा खान चर्चेचा विषय ठरली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट दिग्दर्शक रुपेश पॉलने सायराला जितकी प्रसिद्धी मिळायला हवी होती तितकी मिळाली नसल्याचं सांगितलं. सायरा अतिशय चांगली कलाकार होती. परंतु मला याचं दुख: वाटतंय की सायराच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये कोणीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. 


जेव्हा मला सायराच्या निधनाबाबत समजलं त्यावेळी मला अतिशय दुख: झालं. परंतु याबाबत कोणीही रिपोर्ट केला नसल्याचं पाहून मला वाईट वाटलं. सायरा उत्तम कलाकार होती परंतु तिला इंडस्ट्रीत हवं तसं काम मिळालं नाही. तिचं जाणं माझ्यासाठी अतिशय दुख:द घटना असून परमेश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो असं रुपेश पॉलने म्हटलं आहे. 



'कामसूत्र ३D'मधून सायराने तिच्या करियरला सुरुवात केली होती. त्याशिवाय सायराने अनेक प्रादेशिक चित्रपटांतूनही काम केलं आहे.