इंटरनेट गाजवणारी कामिया जानी जगन्नाथ मंदिरात जाताच भाजपचा कडाडून विरोध; ती आहे तरी कोण?
Kamiya Jagannath Puri Video Controversy: भाजपा का करतोय कामियाचा विरोध? नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.
Kamiya Jagannath Puri Video Controversy: सोशल मीडियावर अनेक असे इन्फ्लुएन्सर आहेत जे त्यांच्या हटके कामगिरीसाठी ओळखले जातात. त्यापैकी एक आहे ‘कर्ली टेल्स’. ‘कर्ली टेल्स' फक्त एकाच धाटणीचे व्हिडीओ करत नाही तर तिचे ट्रॅव्हल आणि फूड संबंधीत देखील असतात. दरम्यान, भाजपाकडून या चॅनलची संस्थापिका कामिया जानीला सध्या अटक करण्याची मागणी होत आहे. खरंतर कामियाचा जगन्नाथ पुरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून ही मागणी सुरु झाली आहे. आता, त्याच व्हिडीओमुळे कामियाला भाजपाचा विरोध होत आहे.
कामियाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत की तिला मंदिरात एन्ट्री कशी दिली? त्यात कामिया जानीची साथ देणारे बीजू जनता दलचा नेका वीके पांडियन यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. चला तर जाणून घेऊया की कामिया जानी कोण आहे आणि जगन्नाथ पुरी मंदिरात नेमकं काय झालं? की थेट तिला अटक करण्याची मागणी होत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात कामिया जानी, बीजेडी नेता वीके पांडियनसोबत दिसत आहे. असा दावा करण्यात येत आहे की हा व्हिडीओ जगन्नाथ पुरी मंदिरमध्ये शूट करण्यात आलं. यात कामिया जानी आणि वीके पांडियन जगन्नाथ पुरी मंदिराच्या 'महाप्रसाद' ची चव घेत होते आणि त्यानंतर त्याविषयी बोलत होते.
दरम्यान, आता बीजेपीनं या सगळ्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याशिवाय आरोप करत म्हटले की कामिया जानी ही स्वत: बीफ खाते आणि त्या जेवणाला प्रमोट देखील केलं. अशा व्यक्तीला कसं काय 12 व्या शतकातील पवित्र मंदिरात एन्ट्री मिळाली. ओडिशा बीजेपीचे महासचिव जतिन मोहंतीनं म्हटलं की बीजेडी नेता वीके पांडियन यांनी यूट्यूबवर कामिया जानीसोबत गोमांस खाताना दिसले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यांनी पुढे म्हटलं की 'गोमांस खाणाऱ्या लोकांसाठी जगन्नाथ मंदिरात जाण्याची एन्ट्री नाही मिळतं. धार्मिक भावना दुखावल्यामुळे आम्ही ही मागणी करतो की कामिया जानी विरोधात भादवि कलम 295 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात यावी. जर कामिया जानीला अटक केलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. '
कोण आहे कामिया जानी?
कामिया जानी ही लोकप्रिय युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. यूट्यूबवर तिचं चॅनल असून त्याचं नाव कर्ली टेल्स आहे. तिचे जवळपास 3 मिलियन सब्सक्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर देखील कामिया जानीचे लाखो फॉलोवर्स आहेत. दरम्यान, संपूर्ण वाद झाल्यानंतर कामिया जानीनं सोशल मीडियावर लिहिलं की 'ती बीफ खात नाही आणि ना कधी खाल्लं. जय जगन्नाथ.'