Divorce च्या चर्चा असतानाच, Actress नं दुसऱ्या पतीसोबत शेअर केला रोमँटिक व्हिडीओ
Actress नं घटस्फोटाच्या चर्चांमध्येच हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Kamya Panjabi Shared A Romantic Video While Rumours Spread About Her Divorce : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काम्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत काम्या ही चाहत्यांच्या चर्चेत असते. दरम्यान, काम्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय का ढरली होती. याविषयी बोलायचे झाले तर गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. त्यात काम्यानं तिचा दुसरा पती शलभ डांगसोबत (Shalabh Dang) रोमान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
काम्यानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. काम्यानं तिचा दुसरा पती शलभ डांगसोबत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काम्या शलभसोबत रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला शलभ हा पुढे चालत असताना दिसत आहे. तर मागूण धावत येऊन काम्या त्याला पकडते. त्यांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांना असं पाहून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर मिळाले आहे. तर काम्यानं पती शलभसोबतचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा : पतिच्या पहिल्या घटस्फोटाला कारणीभूत तूच म्हणणाऱ्यांना; Hansika Motwani नं दिलं जशास तसं उत्तर
काम्याच्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घ्यायचे असेल तर स्वत: काम्या तिच्या लव्ह स्टोरीविषयी बोलते की, तिच्या पहिल्या लग्नामध्ये ती आनंद नव्हती. त्यानंतर तिनं जेव्हा स्वतःसाठी आनंदाचा मार्ग शोधला तेव्हा तिची भेट ही शलभ डांगशी झाली. खरंतर काम्या आणि शलभ यांची ओळख कशी झाली असा सवाल असेल तर सगळ्यात आधी काम्या आणि शलभ यांच्यात कामावरून फोनवरच बोलणे झाले होते. त्यानंतर त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही काळानंतर शलभनं काम्याला लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर काम्यानं काहीवेळ विचार केला आणि अखेरीस तिनं शलभला होकार दिला. त्यानंतर काय तर 10 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी लग्न केलं. काम्या आणि शलभ दोघांचं हे दुसरं लग्न आहे. काम्याला पहिल्या लग्नातून एक मुलगी आहे तर शलभला त्याच्या पहिल्या लग्नातून मुलगा आहे.